Join us

पश्चिम रेल्वेचा फुकट्यांवर कारवाईचा धडाका, १ लाख १२ हजार प्रवाशांकडून दंडवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 7:07 AM

मुंबई विभागात ९ कोटी ७५ लाख रुपये दंड वसूल केला गेला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेतील फुकट्या प्रवाशांची आकडेवारी फुगत चालली आहे. प. रेल्वेने या संबंधात गेल्या दोन महिन्यांमध्ये उपनगरीय सेवा आणि बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या यामध्ये केलेल्या धडक कारवाईद्वारे ३ लाख १२ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ३६ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये मुंबई विभागात १ लाख १२ हजार प्रवाशांकडून ९ कोटी ७५ लाख रुपये दंड वसूल केला गेला. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत ही फुकट्यांची वाढ तिप्पट प्रमाणात झाली आहे.

टॅग्स :पश्चिम रेल्वे