Join us  

तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत

By admin | Published: March 13, 2016 4:33 AM

शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावरील लोकल संथगतीने धावत होत्या

मुंबई : शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावरील लोकल संथगतीने धावत होत्या. सांताक्रुझ येथे सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अप आणि डाउन अशा दोन्ही दिशेकडील लोकल मंदावल्याने प्रवाशांचे हाल झाले. पावणेचार वाजण्याच्या सुमारास बिघाड दुरुस्त झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ येथील धीम्या मार्गावर चर्चगेट दिशेकडील एका सिग्नलमध्ये बिघाड झाला. परिणामी, चर्चगेट आणि बोरीवली दिशेकडील दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती. (प्रतिनिधी)