पश्चिम रेल्वेच्या दिवाळी, ख्रिसमससाठी विशेष गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 12:58 AM2019-10-08T00:58:54+5:302019-10-08T01:07:43+5:30
वांद्रे टर्मिनस ते मंगलोर साप्ताहिक सुविधा विशेष एक्स्प्रेसच्या ८ फे-या चालविण्यात येतील.
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी, ख्रिसमससाठी वेगवेगळ्या मार्गावरून १३ विशेष एक्स्प्रेसच्या १२० फेऱ्या चालविण्यात येतील.
वांद्रे टर्मिनस ते मंगलोर साप्ताहिक सुविधा विशेष एक्स्प्रेसच्या ८ फे-या चालविण्यात येतील. २२, २९ आॅक्टोबर, २४, ३१ डिसेंबर या दिवशी रात्री ११.५५ वाजता वांद्रे टर्मिनसहून गाडी मंगलोरसाठी सुटेल. त्याचप्रमाणे, वांद्रे टर्मिनस ते मंगलोर एक्स्प्रेस जंक्शन साप्ताहिक विशेष ट्रेनच्या ४ फेºया चालविण्यात येतील. ५, १२ नोव्हेंबर या दिवशी रात्री ११.५५ वाजता वांद्रे टर्मिनसहून गाडी मंगलोरसाठी सुटेल.
वांद्रे टर्मिनस ते जम्मू तावी साप्ताहिक एसी सुपरफास्ट विशेष ट्रेनच्या २२ फेºया चालविण्यात येतील. २१ आॅक्टोबर ते ३० डिसेंबर या कालावधीत वांद्रे टर्मिनसहून पहाटे ५.१० वाजता जम्मू तावीसाठी सुटेल. वांद्रे टर्मिनस ते पालिताना सुपरफास्ट विशेष ट्रेनच्या १६ फेºया चालविण्यात येतील. १६ आॅक्टोबर ते १ जानेवारीपर्यंत वांद्रे टर्मिनसहून प्रत्येक बुधवारी दुपारी ५.३० वाजता सुटेल.
वांद्रे टर्मिनस ते गांधीधाम साप्ताहिक सुपरफास्ट सुविधा विशेष ट्रेनच्या ५ फेºया चालविण्यात येतील. २६ आॅक्टोबर, २ नोव्हेंबर आणि २१, २८ डिसेंबर रोजी चालविण्यात येतील. वांद्रे स्थानकातून मध्यरात्री १२.२५ वाजता ही गाडी सुटेल.