Join us

लाइट, कॅमेरा ॲक्शनमधून पश्चिम रेल्वे मालामाल; १.२१ कोटींची केली कमाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 7:51 AM

पश्चिम रेल्वेच्या स्थानकांना चित्रपट निर्माते चित्रीकरणासाठी नेहमीच पसंती देतात.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई:पश्चिम रेल्वेच्या स्थानकांना चित्रपट निर्माते चित्रीकरणासाठी नेहमीच पसंती देतात. यंदा पश्चिम रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांवर ३४ चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले. या चित्रीकरणातून १.२१ कोटींची कमाई केली आहे. चित्रीकरणामध्ये ८ चित्रपट, ३ वेबसीरिज, एक जाहिरात, दोन  डॉक्युमेंटरी, एका मालिकेचा समावेश आहे.

पश्चिम रेल्वे लंच बॉक्स, हिरोपंथी २, गब्बर इज बॅक, एअरलिफ्ट, पॅडमॅन, रा. वन, फँटम, एक विलन रिटर्न्स, ये जवानी है दीवानी, राधे, लक्ष्मी बॉम्ब, काई पो चे, आत्मा, घायल  रिटर्न,  कमीने,  हीरोपंथी, हॉलिडे, थुपकी (तमिल फिल्म), डी-डे, शेरशाह, बेल बॉटम, ओएमजी २,  तसेच मराठी चित्रपट आपडी थापडी सारख्या अनेक चित्रपटांची साक्षीदार आहे.  एक्स-रे, अभय २, ब्रीथ इनटू द शॅडोज, डोंगरी टू दुबई आणि केबीसीचा प्रोमोही चित्रित करण्यात आला आहे. गुजराथी चित्रपटाचेही चित्रीकरण झाले आहे.

या स्थानकांना पसंती

मुंबई सेंट्रल टर्मिनस स्टेशन, चर्चगेट मुख्यालय आणि स्टेशन भवन, साबरमती स्पोर्ट्स ग्राउंड, गोरेगाव स्टेशन, जोगेश्वरी एटी (यार्ड), लोअर परळ वर्कशॉप, कांदिवली आणि  विरार कारशेड, केळवे रोड, पारडी रेल्वे  स्टेशन, कालाकुंड, पातालपानी स्थानकांना पसंती मिळाली आहे. मुंबई सेंट्रल आणि  बलसाड  दरम्यान गाडीत तसेच गोरेगावमध्ये चालू गाडीत चित्रीकरण झाले आहे.   

पश्चिम रेल्वेच्या कोणत्याही अडथळ्याशिवाय परवानगी देण्याचा उपक्रमामुळे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न चित्रीकरणातून मिळाले आहे.  अलीकडेच  चित्रीकरणाच्या परवानगीला गती देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. या सोप्या प्रक्रियेमुळे चित्रपट कंपन्यांना आवश्यक कागदपत्रांसह स्क्रिप्ट आणि अर्जासह परवानगी मिळणे शक्य होत आहे. - सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :पश्चिम रेल्वेमुंबई