पश्चिम रेल्वेचा चालू वर्षात २५ दशलक्ष टन वाहतुकीचा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:07 AM2021-07-27T04:07:08+5:302021-07-27T04:07:08+5:30
मुंबई : माल आणि पार्सल वाहतूक करून पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी अबाधित ठेवली आहे. चालू वर्षात ...
मुंबई : माल आणि पार्सल वाहतूक करून पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी अबाधित ठेवली आहे. चालू वर्षात २५ जुलैपर्यंत २६.२८ दशलक्ष टन वाहतूक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच काळात २०.४२ दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली होती. त्यामध्ये २८ टक्क्यांतून अधिक वाढ झाली आहे.
१ एप्रिल २०२१ ते २५ जुलैपर्यंत पश्चिम रेल्वेने २४० पार्सल विशेष गाड्यांच्या माध्यमातून ९० हजार टनहून अधिक वजनाच्या वस्तूची वाहतूक केली आहे. त्यात शेतीमाल, औषधे, वैद्यकीय उपकरणे, मासे आणि दूध यांचा समावेश आहे. याद्वारे ३०.६९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
या काळात पश्चिम रेल्वेने ४० हजार टनांहून अधिक दुधाची वाहतूक केली. ५८ दूध विशेष गाड्या चालविण्यात आल्या, ७० कोरोना विशेष पार्सल गाड्या चालविण्यात आल्या. यामध्ये सुमारे १२००० टन अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक केली आहे.
260721\img-20210726-wa0032.jpg
रेल्वे मालवाहतूक