अनुयायांच्या मदतीसाठी पश्चिम रेल्वेची मदत केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 04:05 AM2018-12-07T04:05:14+5:302018-12-07T04:05:19+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त देशभरातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांना साहाय्य व्हावे यासाठी पश्चिम रेल्वेतर्फे विविध ठिकाणी मदत केंद्रे स्थापन करण्यात आली होती.

 Western Railway Help Centers to help the followers | अनुयायांच्या मदतीसाठी पश्चिम रेल्वेची मदत केंद्रे

अनुयायांच्या मदतीसाठी पश्चिम रेल्वेची मदत केंद्रे

Next

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त देशभरातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांना साहाय्य व्हावे यासाठी पश्चिम रेल्वेतर्फे विविध ठिकाणी मदत केंद्रे स्थापन करण्यात आली होती. पश्चिम रेल्वेतर्फे चालवण्यात आलेल्या विविध विशेष रेल्वे व इतर सुविधांची माहिती या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली. दादर येथील मुख्य पादचारी पुलासह इतर चार ठिकाणी ही मदत केंद्रे सुरू करण्यात आली होती.
पश्चिम रेल्वेतर्फे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता यांनी चर्चगेट येथील मुख्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या वेळी संविधान सभेतील बाबासाहेबांच्या भाषणाची क्लिप दाखवण्यात आली.
पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर अनुयायांच्या साहाय्यासाठी मदत केंद्रे स्थापन करण्यात आली होती. मराठी व
हिंदी भाषेत संवाद साधू
शकणाºया कर्मचाºयांना या केंद्रांवर २४ तासांसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.
चर्चगेट, दादर, अंधेरी, माहिम व बोरीवली स्थानकांवर असलेल्या या केंद्रांच्या माध्यमातून अनुयायांना गिरगाव, चैत्यभूमी, वरळी व इतर ठिकाणी जाण्यासंदर्भात आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले. ७ डिसेंबरपर्यंत ही केंद्रे कार्यरत राहणार आहेत.
तसेच या कालावधीत तिकीट आरक्षण, तिकीट रद्द करणे, रिफंड करणे या सेवांवरील वाढता ताण लक्षात घेऊन ५ ते ७ डिसेंबरपर्यंत अतिरिक्त खिडक्यांच्या माध्यमातून काम केले जात आहे. दादर, माहिम, बोरीवली स्थानकांवर एटीव्हीएमद्वारे तिकीट काढण्यास प्रवाशांना साहाय्य करण्यासाठी रेल्वेने कर्मचारी तैनात केले आहेत.
मुंबईबाहेरून आलेल्या अनुयायांची दखल घेत दादर व माहिम स्थानकांवर प्रवासी लोकलमध्ये चढल्यानंतरच गाडीला हिरवा सिग्नल देण्याचे निर्देश कर्मचाºयांना देण्यात आले होते.

Web Title:  Western Railway Help Centers to help the followers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.