Join us

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मिळाली स्वातंत्र्य दिनाची भेट; १५ डब्यांच्या ४९ फेऱ्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 12:50 PM

गर्दीपासून सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा  प्रवास स्वातंत्र्य दिनापासून आणखी आरामदायी होणार आहे. रेल्वे प्रवाशांचा प्रवास गर्दीमुक्त व्हावा यासाठी बारा डब्यांच्या लोकल पंधरा डब्यांच्या करण्यात येणार आहेत. पंधरा डब्यांच्या लोकलच्या ४९ फेऱ्या चालविण्यात येणार आहे.

चर्चगेट ते विरार, विरार ते अंधेरी,नालासोपारा ते अंधेरी आणि विरार ते बोरीवली दरम्यान या लोकल धावणार आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. पश्चिम रेल्वेवर दररोज सुमारे २८ लाख प्रवासी प्रवास करतात. सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरवेळी तर लोकलला प्रचंड गर्दी असते. त्यामुळे १५ डबा लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होते. 

यामुळे पश्चिम रेल्वेने १२ डबा लोकलला आणखी ३ डबे जोडून १५ डबा लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १५ डबा झालेल्या प्रत्येक लोकलची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे. या ४९ फेऱ्यांपैकी १२ फेऱ्या जलद मार्गावर चालविण्यात येणार आहे. तर यात अप दिशेला २४ आणि डाउन दिशेला २५ लोकल आहेत. यात अंधेरी ते विरार दरम्यान धिम्या मार्गावर सर्वाधिक लोकल आहेत. यामुळे पंधरा डब्याच्या लोकलच्या फेऱ्यांची एकूण संख्या १५० वरून १९९ झाली. सध्या पश्चिम रेल्वेकडे १५ डब्यांच्या नऊ लोकल आहेत.

पश्चिम रेल्वे दरोरोज सरासरी प्रवासी संख्या २८ लाख, पश्चिम रेल्वेरील १५ डब्यांच्या ९ लोकल, डब्यांच्या लोकल फेऱ्या १५० सध्या १९९ १५ ऑगस्ट पासून

 

टॅग्स :पश्चिम रेल्वे