मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 08:44 AM2017-12-21T08:44:41+5:302017-12-21T13:03:12+5:30

पश्चिम रेल्वेवरील वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे. तांत्रिक बिघाडामुळे गुरूवारी (21 डिसेंबर) सकाळपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

western railway running late due to technical fault | मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना मनस्ताप

मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना मनस्ताप

googlenewsNext

मुंबई - पश्चिम रेल्वेवरील वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे. तांत्रिक बिघाडामुळे गुरूवारी (21 डिसेंबर) सकाळपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंधेरी व जोगेश्वरी या स्थानकांदरम्यान दुरूस्तीच्या कामासाठी बुधवारी (20 डिसेंबर) रात्री पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक जाहीर करण्यात आला होता. 

मात्र, दुरुस्तीचं  काम वेळेत न संपल्यामुळे याचा परिणाम वाहतूक सेवेवर झाला आहे. यामुळे ऐन सकाळी कार्यालय गाठण्याच्या घाईत असलेल्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे. सकाळी-सकाळीच रेल्वे मार्गावर झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दीदेखील झाली आहे.  
 

Web Title: western railway running late due to technical fault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.