Join us

पश्चिम रेल्वेची अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:07 AM

मुंबई : कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता पश्चिम रेल्वेने फेरीवाल्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. आरपीएफने २०२० मध्ये अनधिकृत फेरीवाले, ...

मुंबई : कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता पश्चिम रेल्वेने फेरीवाल्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. आरपीएफने २०२० मध्ये अनधिकृत फेरीवाले, विक्रेते, भिकारी यांच्याविरोधात मोहीम राबवली. या कारवाईत ३२.८४ लाख आणि एप्रिल २०२१ पर्यंतच्या १९.७० लाख असे एकूण ५२ लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली.

आरपीएफने २०२० मध्ये केलेल्या कारवाईत ८६५४ फेरीवाल्यांवर कारवाई केली. त्यामध्ये ३२८४५१९ रुपयांचा दंड वसूल केला. २०२१ मध्ये २४ एप्रिलपर्यंत फेरीवाले आणि भिकारी यांच्यावर कारवाई करून ७६९५ जणांना अटक करून त्यांच्याकडून १९,७०,०४५ रुपयांचा दंड वसूल केला.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात २०२० मध्ये ४४३८ अनधिकृत विक्रेते, भिकारी यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २१,९७,६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर एप्रिल २०२१ पर्यंत ३६९८ घटना समोर आल्या. यामध्ये १५,५०,१९५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

.......................