पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवाशांकडून ११३ कोटींची दंड वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 03:59 AM2020-02-21T03:59:23+5:302020-02-21T03:59:33+5:30

२ हजार ४०३ गर्दुल्ले आणि ५ हजार २७८ अनधिकृत फेरीवाल्यांना रेल्वे परिसराच्या

Western Railways charges a fine of Rs 2 crore from uninsured passengers | पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवाशांकडून ११३ कोटींची दंड वसुली

पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवाशांकडून ११३ कोटींची दंड वसुली

Next

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरून एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या दहा महिन्यांत २३ लाख ४५ हजार विनातिकीट प्रवास केला. त्यांच्याकडून पश्चिम रेल्वे प्रशासनाने ११३ कोटींची दंड वसुली केली आहे.

२ हजार ४०३ गर्दुल्ले आणि ५ हजार २७८ अनधिकृत फेरीवाल्यांना रेल्वे परिसराच्या बाहेर काढण्यात आले. यासह त्यांच्याकडून दंड वसुली केली. ज्यांनी दंड भरला नाही, अशा १ हजार २५५ जणांना कैद करण्यात आले. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले की, एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या काळात पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाने दलालांच्या विरोधात २ हजार ३९३ कारवाया केल्या. यामध्ये २ हजार १३९ व्यक्तींना ताब्यात घेऊन दंड वसूल करण्यात आला आहे.

Web Title: Western Railways charges a fine of Rs 2 crore from uninsured passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.