मुंबई : पश्चिम रेल्वेने मुंबईकरांचा लोकल प्रवास गर्दी मुक्ता व्हावा याकरिता मुंबई उपनगरीय गाड्यांचा वेळापत्रकात महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ६ नोव्हेंबर २०२३ पासून पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त १७ एसी लोकल सेवा सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे एसी लोकल फेऱ्यांची संख्या ७९ वरून ९६ होणार आहे. एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १३९४ राहणार आहे.
एसी लोकलच्या येत्या सोमवारपासून १७ नवीन फेऱ्या सुरू केल्या जातील. यामध्ये अपच्या दिशेने ९ आणि डाऊन दिशेच्या ८ फेऱ्या असणार आहेत. अप दिशेला नालासोपारा-चर्चगेट, विरार-बोरीवली आणि भाईंदर -बोरीवली दरम्यान एक सेवा, विरार-चर्चगेट दरम्यान दोन सेवा आणि बोरीवली-चर्चगेट दम्यान चार सेवा असतील तसेच डाउन दिशेला चर्चगेट-भाईंदर आणि बोरीवली-विरार दरम्यान एक सेवा, चर्चगेट-विरार आणि चर्चगेट-बोरीवली दरम्यान तीन सेवा असणार आहेत डहाणू लोकलचा विस्तार
डहाणू लोकलच्या प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी डहाणू रोड लोकलची एक जोडी चर्चगेटपर्यंत विस्तारित केली जाणार आहे. अप मार्गावरील लोकल सकाळी ६. ०५ वाजता डहाणू रोड येथून सुटेल आणि सकाळी ८. २३ वाजता चर्चगेटला पोहचेल . डाऊन मार्गावरील लोकल चर्चगेट येथून ७.१७ वाजता सुटेल आणि ९.५० वाजता डहाणू रोड येथे पोहचेल.
अप मार्गावरील लोकल
नालासोपारा - ४. ५५ धीमी बोरिवली - ७. ४७
जलद
बोरिवली - ९. ३५ जलद बोरिवली - ११. २३ जलद विरार - दुपारी १. ३४ जलद विरार - ४. ४८ धीमी बोरिवली - ५. २८ जलदविरार - ७. ५१ जलदभाईंदर - २२. ५६ धीमीडाऊन मार्गावरील लोकल
चर्चगेट - ६.३५ धीमी चर्चगेट - ८.४६ जलद चर्चगेट - १०.३२ जलद चर्चगेट - १२.१६ जलदचर्चगेट - दुपारी ३.०७ जलदबोरिवली - सायंकाळी ६.२२ जलद चर्चगेट - रात्री ९.२३ जलदबोरिवली - ११. १९ धीमी