पश्चिम रेल्वेचे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स; भारतीय रेल्वे विभागही आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 02:54 AM2020-02-07T02:54:30+5:302020-02-07T06:21:16+5:30
फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर अॅक्टिव्ह
- कुलदीप घायवट
मुंबई : ट्विटरवर, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर प्रत्येक जण अॅक्टिव्ह आहे. दररोज प्रत्येक जण आपला बराचसा वेळ सोशल मीडियावर सक्रिय असतो. याचबरोबर मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेही सोशल मीडियावर सक्रिय आहे. रेल्वेमधील नवीन मोहिमा, उपक्रम, प्रवाशांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी रेल्वे सोशल मीडियाचा आधार घेत आहे. भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम रेल्वे सर्वाधिक ट्विटर अकाउंटचे फॉलोअर्स असल्याचे दिसून आले.
लोकल, एक्स्प्रेसमधील अस्वच्छतेविषयी तक्रार करण्यासाठी ट्विटरवरचा सर्वाधिक वापर प्रवाशांकडून होतो. पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून यावर त्वरित तक्रारीची नोंद घेऊन स्वच्छता केली जाते. महिला प्रवाशांसाठी सुरक्षा विभागाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. स्वच्छता मोहीम, सुरक्षा सप्ताह, नवीन यंत्रणा याची माहिती पश्चिम रेल्वे ट्विटरवर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यावरून देते.
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलचा वक्तशीरपणा सर्वाधिक आहे. त्याप्रमाणे प्रवाशांच्या तक्रारीचे निर्वारण करण्यासाठीही ‘पश्चिम रेल्वे’ची सोशल मीडिया पुढे आहे. भारतीय रेल्वेमधील झोनपैकी सर्वाधिक फॉलोअर्स पश्चिम रेल्वे झोनचे आहेत. ट्विटरवरवर पश्चिम रेल्वेच्या टिष्ट्वटर अंकाउंटचे सुमारे २ लाख ७३ हजार १३३ फॉलोअर्स आहेत. त्यानंतर मध्य रेल्वेच्या ट्विटरवर अकाउंटचा क्रमांक लागतो. मध्य रेल्वेच्या ट्विटरवर अकाउंटचे सुमारे २ लाख २७ हजार फॉलोअर्स आहेत.
भारतीय रेल्वेमधील सर्व झोनमध्ये पश्चिम रेल्वे अग्रेसर
विभाग ट्विटरवर फॉलोअर्स
पश्चिम रेल्वे २ लाख ९१ हजार
मध्य रेल्वे २ लाख ३६ हजार
उत्तर रेल्वे ५१ हजार
पूर्व रेल्वे ३९ हजार
दक्षिण रेल्वे ३० हजार
दक्षिण पश्चिम रेल्वे २९ हजार
पूर्व कोस्ट रेल्वे २४ हजार
पूर्व मध्य रेल्वे २२ हजार
दक्षिण पूर्व रेल्वे २३ हजार
पश्चिम मध्य रेल्वे १९ हजार
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ८ हजार ९२२
प्रवाशांनी प्रतिसाद केलेले ट्विट
जानेवारी- ७५०
फेब्रुवारी- ७५९
मार्च- ९१५
एप्रिल- ७७३
मे- ८५३
जून- १ हजार १२५
जुलै- १ हजार ११६
ऑगस्ट- ९९३
सप्टेंबर- ७०४
ऑक्टोबर- ६७८
नोव्हेंबर- ६७०
एकूण ९ हजार ३४६