वेस्टर्न...व्हॉट्स ॲपमुळे चिमुकली सापडली
By admin | Published: September 12, 2014 10:38 PM
व्हॉट्स ॲपमुळे हरवलेली चिमुकली सापडली
व्हॉट्स ॲपमुळे हरवलेली चिमुकली सापडलीपोलिसांच्या तत्परतेमुळे दीड तासात लागला शोधकांदिवली: अनेकदा सोशल मीडियाचा विघातक पद्धतीने झालेला वापर समोर येत असतो. मात्र, हा वापर विधायक पद्धतीने देखील केला जाऊ शकतो, हे कांदिवली पोलिसांनी दाखवून दिले आहे. एका दोन वर्षीय हरवलेल्या चिमुरडीचा शोध पोलिसांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमुळे लागला. कांदिवली पोलिसांनी अवघ्या दीड तासांत या चिमुरडीला तिच्या वडिलांकडे सुपूर्द केले आहे. व्हॉट्स ॲपची लोकप्रियता लक्षात घेऊन उत्तर प्रादेशिक विभागात पोलीस उपायुक्त असताना ब्रिजेश सिंग यांनी व्हॉट्स ॲपवर क्र ाईम प्रिर्झव्हेशन ग्रुप तयार केला होता. या ग्रुपच्या माध्यमातून गोरेगाव ते दहिसरच्या १६ पोलीस ठाण्यांमध्ये ग्रुप तयार करून परिसरातील सामान्य नागरिकांनाही कनेक्ट करण्यात आले. या पोलिसांच्या व्हॉट्स ॲप ग्रुप मुळेच एक हरवलेली मुलगी अवघ्या दीड तासांत पालकांना मिळाली. साइबा ही दोन वर्षांची गोंडस मुलगी कांदिवली पश्चिमेत ९० फूट रोड गांधी नगर येथील साफी गल्ली येथे राहते. मंगळवारी घराबाहेर खेळताना ती चुकली आणि तेथेच रडत असताना तिला एका इसमाने लालजी पाडा पोलिस चौकीत नेऊन सोडले. त्यानंतर कांदिवली पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असणार्या सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी तिचा फोटो कांदिवली पोलिसांच्या ग्रुप वर टाकला. या ग्रुपमध्ये पोलिसांसह स्थानिक पत्रकार, मोहल्ला कमिटी, महिला समितीमधील लोक असल्यामुळे हा फोटो विभागात सर्वत्र पसरला. साइबाचे वडील मोहम्मद मारु खान यांना तो एका व्यक्तीने दाखवला, त्यानंतर तत्काळ कांदिवली पोलीस ठाण्यात जाऊन साइबाच्या वडिलांनी साइबाला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)......................................................(कोट)या घटनेमुळे पोलिसांची कर्तव्य दक्षता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा उपयोगी ठरु शकतो, हे सिद्ध झाले आहे. -महिपती पांढरमिसे, कांदिवली वरिष्ठ पोलीस निरीक्षक......................................................