ओला व सुका कचरा अखेर होणार वेगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 12:09 AM2020-03-06T00:09:31+5:302020-03-06T00:09:33+5:30

यापुढे घराघरातून वेगळा होऊन आलेला ओला व सुका कचरा स्वतंत्र उचलला जाणार आहे. परिणामी, कचरा वर्गीकरणावर आता प्रभावी अंमल होऊ शकणार आहे.

 Wet and dry waste will eventually be different | ओला व सुका कचरा अखेर होणार वेगळा

ओला व सुका कचरा अखेर होणार वेगळा

Next

मुंबई : ओला व सुका कचरा स्वतंत्र गोळा करण्यासाठी महापालिकेने छोट्या व मोठ्या आकाराचे कॉम्पॅक्टर, तसेच छोट्या बंद वाहनाची आणि ड्राय वेस्ट टेम्पोची व्यवस्था केली आहे. यामुळे यापुढे घराघरातून वेगळा होऊन आलेला ओला व सुका कचरा स्वतंत्र उचलला जाणार आहे. परिणामी, कचरा वर्गीकरणावर आता प्रभावी अंमल होऊ शकणार आहे.
मुंबईतील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने सुका व ओला कचरा वर्गीकरण, ओला कचºयावर प्रक्रिया बंधनकारक केले आहे. त्यानुसार दररोज शंभर किलो अधिक कचरा निर्माण करणाºया मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ओला कचºयावर प्रक्रिया सक्तीची करण्यात आली. अनेक सोसायट्यांमध्ये ओला कचºयावर प्रक्रिया केली जात आहे. मात्र घराघरांतून वेगळा होऊन आलेला सुका व ओला कचरा एकत्रित कचराभूमीवर जात असल्याचे आढळून आले होते. यामुळे या मोहिमेला पालिकेकडूनच हरताळ फासला जात होता. अखेर ही त्रुटी दूर करण्यासाठी पालिकेतर्फे सर्व २४ प्रशासकीय विभागांतील ओला व सुका कचरा वेगळा उचलण्याची व्यवस्था केली आहे.
त्यानुसार वर्गीकरण केलेल्या ओल्या व सुक्या कचºयाचे संकलन व वहनासाठी आवश्यक तेवढे मिनी व लार्ज कॉम्पॅक्टर, छोट्या बंद वाहनाची आणि ड्राय वेस्ट टेंम्पोची व्यवस्था करण्यात आली आहे. झोपडपट्टी अथवा छोट्या घरगल्ल्या असलेल्या विभागात छोट्या बंद वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच घरगुती घातक कचरा गोळा करण्यासाठी वेगळा विभाग नसल्याने सुक्या कचºयातच हा कचरा गोळा करण्यात येत होता. परंतु आता प्रत्येक वाहनामध्ये बदल करून घरगुती घातक कचरा वेगळा गोळा करण्याची व्यवस्थाही आता करण्यात आली आहे.
>असा उचलला जातो कचरा...
नागरिकांनी वेगळा केलेला ओला कचरा हा पालिकेच्या दाब संयंत्राद्वारे उचलला जातो. तसेच सुका कचरा कंत्राटदाराद्वारे पुरविण्यात येणाºया वाहनांद्वारे दररोज एक वाहन वापरून दोन फेऱ्यांद्वारे उचलण्यात येतो. याबाबत नागरिकांना सूचित करण्याकरिता ओला कचरा वाहनांवर घंटेची व्यवस्था करण्यात आली आहे. संकलित करण्यात येत असलेल्या कचºयाबाबत कर्मचाºयांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत. मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती करणाºयांकडून सुका कचरा परस्पर भंगारवाल्यास विकला जातो किंवा पालिकेच्या ४६ सुका कचरा संकलन केंद्रांना दिला जातो. ही सर्व कचरा संकलन केंद्रे कचरा वेचक संघटनांमार्फत चालविली जातात. पालिकेने या संघटनांना प्रत्येक घरातून केवळ सुका कचरा संकलन व वहनासाठी एकूण ९४ वाहने दिलेली आहेत. झोपडपट्टी विभागात स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत प्रति दीडशे एककासाठी लोकसहभागाद्वारे ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येतो. तसेच, ‘प्रगत परिसर व्यवस्थापन’ या संकल्पनेअंतर्गत प्रगत परिसर व्यवस्थापन समूह तयार करून नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरण व स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाते. मोठ्या प्रमाणात म्हणजेच १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्मिती करणाºया शासकीय व निमशासकीय कार्यालये, व्यापारी संस्था, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, हॉटेल अशा ठिकाणी कचºयाचे वर्गीकरण करण्यास सूचित करण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत एक हजार ६९८ गृहनिर्माण संस्थांकडून ओल्या कचºयावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जाते. तर सुका कचरा परस्पर भंगारवाल्यास विकला जातो किंवा पालिकेच्या सुका कचरा संकलन केंद्रांना दिला जातो.

Web Title:  Wet and dry waste will eventually be different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.