ओला, उबर चालकांना अद्यापही मदत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:19 AM2020-04-26T00:19:25+5:302020-04-26T00:19:30+5:30

गाडीच्या हप्त्याचे टेन्शन आहे़ असे असले तरी आतापर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही, असे ओला, उबरच्या चालकांनी सांगितले.

Wet, Uber drivers still have no help! | ओला, उबर चालकांना अद्यापही मदत नाही!

ओला, उबर चालकांना अद्यापही मदत नाही!

Next

मुंबई : लॉकडाउनमुळे ओला, उबरच्या टॅक्सी बंद आहेत, त्यामुळे एका रुपयाची कमाई नाही. गाडीच्या हप्त्याचे टेन्शन आहे़ असे असले तरी आतापर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही, असे ओला, उबरच्या चालकांनी सांगितले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. त्याचा रोजगारावर परिणाम झाला आहे. ओला चालक सचिन जावळे यांनी सांगितले की, कोरोनामुळे भाडे कमी झाले आहे. दैनंदिन खर्च यावरच चालतो. एक महिन्यापासून तर गाडी बंद आहे. दैनंदिन खर्च कसा भागवायचा, गाडीच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे याची चिंता आहे. कंपनीकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. आम्ही मित्राकडून उधार घेऊन घर चालवत आहोत.
>आम्हाला मदतीची गरज आहे.
उबर चालक तुकाराम रौधळ म्हणाले, उबर चालकाला कोरोना झाल्यामुळे प्रवासी ओला, उबर टॅक्सीमध्ये बसण्याचे टाळत होते. तसेच एखाद्या प्रवाशाला कोरोना असेल तर त्यापासून आपल्याला होऊ शकतो अशी भीती होती. त्यामुळे आम्ही महिनाभरापासून पूर्णपणे गाड्या बंद ठेवल्या आहेत. आमचा आठ गाड्यांचा गट आहे. मित्राच्या चार, माझ्या दोन, आणखी एका मित्राची एक अशा सात गाड्या आहेत. पण आम्हाला कोणतीही मदत मिळलेली नाही. तसेच माझ्या इतर चालक मित्रांनाही कोणत्याही प्रकारची मदत अद्याप मिळालेली नाही.
वाहनचालकांना वैद्यकीय खर्चाची मदत
कोरोनाच्या संकटात ओलाकडून वाहनचालकांना मदत केली जात आहे. पण ही मदत आर्थिक स्वरूपात नसून वैद्यकीय स्वरूपात आहे. चालक किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या आजारपणासाठी ओलाकडून साहाय्य करण्यात येते, असे ओलाकडून सांगण्यात आले. तर उबर केअर फंडातून देशभरातील ५५००० उबर चालकांना मदत करण्यात आली आहे.

Web Title: Wet, Uber drivers still have no help!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.