२.५ लाख झोपड्यांच्या पुनर्वसनाचे धोरण काय?

By admin | Published: June 21, 2016 02:55 AM2016-06-21T02:55:42+5:302016-06-21T02:55:42+5:30

अंधेरी पूर्वेकडील सहार येथील विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीत राहणाऱ्या लाखो झोपडीधारकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाचे नेमके धोरण काय आहे?

What is the 2.5 million hut rehabilitation policy? | २.५ लाख झोपड्यांच्या पुनर्वसनाचे धोरण काय?

२.५ लाख झोपड्यांच्या पुनर्वसनाचे धोरण काय?

Next

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील सहार येथील विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीत राहणाऱ्या लाखो झोपडीधारकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाचे नेमके धोरण काय आहे? हे जोपर्यंत स्पष्ट होणार नाही, तोपर्यंत या परिसरात प्रशासनाकडून केला जाणारा सर्वेक्षणाचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे पक्षाच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात उपनगर जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेत रहिवाशांच्या समस्यांना वाचा फोडली आहे.
येथील तलाव पाखाडी रोड क्रमांक ३ वरील सुमारे ३०९ एकर जमिनीवर पसरलेल्या झोपडपट्टीतील २.५ लाख झोपडीधारकांचे सर्वेक्षण करण्याबाबतच्या नोटीस येथे लावण्यात आल्या आहेत. या झोपडपट्टी परिसराचा विस्तार अंधेरी पूर्व, कुर्ला, विलेपार्ले, कलिना विधानसभेतील महापालिकेच्या २२ प्रभागांमध्ये झाला आहे. मात्र प्रशासनाकडून येथील रहिवाशांवर स्थलांतरणासाठी दबाव टाकला जात आहे. परिणामी न्याय मिळावा म्हणून रहिवाशांनी मनसेशी संपर्क साधल्यावर पक्षाच्या शिष्टमंडळाने उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये संजय चित्रे, नगरसेवक दिलीप लांडे, संदीप दळवी, शरद सावंत, वीणा भागवत, विभाग अध्यक्ष सुहास शिंदे, ज्योती अंधारे, रवी इंदुलकर, सुप्रिया पवार, दीपक रावराणे, वीरेन जाधव, प्रमोद म्हसकर, अभिषेक सप्रे, नयना कनल यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

निम्म्या लोकांना प्रशासनाने कुर्ला प्रिमियर येथे स्थलांतरित केले आहे. उर्वरित लोकांना स्थलांतरित करण्यासाठी सुमारे शंभर एकर जागेची आवश्यकता आहे. मात्र अद्यापही शंभर एकर जागा कोणती व सहारपासून किती अंतरावर आहे, हे प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही.
- शालिनी ठाकरे, सरचिटणीस - मनसे
प्रशासन रहिवाशांच्या स्थलांतरणाबाबत म्हाडा, एसआरए, महापालिका आणि तहसिलदाराची बैठक बोलवण्यात येईल. शिवाय बैठकीसाठी मनसेलाही बोलावण्यात येईल.
- दिपेंद्रसिंह कुशवाह, पदाधिकारी - मनसे

Web Title: What is the 2.5 million hut rehabilitation policy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.