उपनगरातील मोडकळीस आलेल्या भाडेकरू इमारतींचे काय? - अतुल भातखळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 02:00 AM2020-08-16T02:00:11+5:302020-08-16T02:00:36+5:30

कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.

What about dilapidated tenant buildings in the suburbs? - Atul Bhatkhalkar | उपनगरातील मोडकळीस आलेल्या भाडेकरू इमारतींचे काय? - अतुल भातखळकर

उपनगरातील मोडकळीस आलेल्या भाडेकरू इमारतींचे काय? - अतुल भातखळकर

Next

मुंबई : मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींच्या बाबतीतला निर्णय घेतला, परंतु उपनगरातील मोडकळीस आलेल्या भाडेकरू इमारतींचे काय? असा प्रश्न कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.
मुंबईच्या उपनगरातसुद्धा मोडकळीस आलेल्या व पुनर्विकासाची गरज असलेल्या हजारो इमारती आहेत, यातील हजारो रहिवाशांना पुनर्विकासाच्या नावाखाली विकासकांनी रस्त्यावर आणले आहे. तसेच मोडकळीस आल्या म्हणून भाडेकरूंना बेघर करण्याचे मोठे षड्यंत्र विकासक करत आहेत. पण त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्नही आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
उपकरप्राप्त इमारती या फक्त मुंबई शहरातील आहेत, उपनगरातील भाडेकरू इमारतींच्या बाबतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये एक धोरण आखले होते व ते विधी खात्याकडे प्रलंबित आहे, इन्सॉल्व्हन्सी आणि बँकरप्टसी अशा कोडसारखा एखादा कायदा करून ज्या भाडेतत्त्वावरील इमारतींचा विकास वर्षानुवर्षे रखडलेला आहे. त्या पुनर्विकासाच्या बाबतीत निर्णय घेणारा आणि भाडेकरूंना दिलासा देणारा एक कायदा करण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा आपण हे गेले काही वर्ष मांडत असल्याचे नमूद केले़ आधीच्या सरकारच्या काळात ही पावले उचलली गेली. त्यामुळे त्याची तत्काळ पूर्तता करून उपनगरातील भाडेकरूंना व अशा प्रकारच्या इमारतीत राहणाऱ्यांना लाखो लोकांनी दिलासा द्यावा व पुनर्विकासाचा रखडलेला मार्ग मोकळा करावा, अशी मागणी केली आहे़
>उपकरप्राप्त इमारती या फक्त मुंबई शहरातील आहेत, उपनगरातील भाडेकरू इमारतींच्या बाबतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये एक धोरण आखले होते व ते विधी खात्याकडे प्रलंबित आहे.

Web Title: What about dilapidated tenant buildings in the suburbs? - Atul Bhatkhalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.