‘भीक मागणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी काय योजना आहेत?’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 04:48 AM2020-08-19T04:48:48+5:302020-08-19T06:55:05+5:30

लहान मुलांच्या पुनर्वसनासाठी काय उपाययोजना आखल्यात, असा सवाल करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

‘What are the plans for the rehabilitation of begging children?’ | ‘भीक मागणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी काय योजना आहेत?’

‘भीक मागणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी काय योजना आहेत?’

Next

मुंबई : भीक मागणाºया लहान मुलांच्या पुनर्वसनासाठी काय उपाययोजना आखल्यात, असा सवाल करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
पुण्याचे रहिवासी ज्ञानेश्वर दारवटकर यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. याचिकादारांचे वकील शेखर जगताप यांनी सांगितले की, सरकार, पुणे पालिकेने काही भिकाऱ्यांची रवानगी सरकारी सुधारगृहात केली. लॉकडाऊननंतर पुन्हा ते रस्त्यांवर दिसतील. भिकाºयांचे विशेषत: लहान मुलांची सुधारणा व पुनर्वसनासाठी काय करणे शक्य आहे, हे पाहावे, असे म्हणत न्यायालयाने महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना पुढील सुनावणीस या प्रकरणी युक्तिवाद करण्याचे निर्देश दिले.

Web Title: ‘What are the plans for the rehabilitation of begging children?’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.