Join us

Raj Thackeray :'खोक्याभाईचं काय घेऊन बसलेत, विधानसभेत सगळे खोके भाईच भरलेत'; राज ठाकरेंचा महायुतीला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 17:36 IST

Raj Thackeray : मनसेची आज मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात बैठक झाली, यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Raj Thackeray ( Marathi News ) : राज्यात काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणुकही काही काही दिवसात होणार आहे, मनसेने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रवींद्र नाट्य मंदिरात महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली. 

पैशाचे सोंग करता येत नाही, 2100 रुपये..; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार स्पष्टच बोलले यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, एक खोक्या भाई घेऊन काय बसला आहेत आख्ख्या विधानसभेत खोके भाई भरले आहेत, असा टोला ठाकरेंनी लगावला. मुळ विषय राहिलेत बाजूला , बाकीच्या विषयात भरकटून टाकलं जातंय, असंही राज ठाकरे म्हणाले. मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत.  त्या सर्व गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन असंही राज ठाकरे म्हणाले. 

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला.  मनसेच्या पक्षसंघटनेत बदल करण्यात आले , मुंबईच्या शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची निवड करण्यात आली . तर दक्षिण मुंबईच्या उपशहर उपाध्यक्षपदी यशवंत किल्लेदार यांची निवड करण्यात आली आहे. 

मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडेंची निवड

पक्षाच्या मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर देण्यात आली आहे. तसंच मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यावर गट अध्यक्षांच्या कामाचा तर राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मनसेच्या शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते.

बाळा नांदगावकर- गट अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेणे

नितीन सरदेसाई- विभाग अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेणे

अमित ठाकरे- शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेणे

मुंबई शहराध्यक्ष- संदीप देशपांडे

टॅग्स :राज ठाकरेमनसेमुंबई