आभासी जगात कशावर विश्वास ठेवावा?; ऑनलाइन अभ्यासावर भाष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 01:30 AM2020-04-24T01:30:58+5:302020-04-24T01:31:03+5:30

कूल किड्स इन क्वारंटाइनच्या फेसबुक सेशनमध्ये चिमुकल्यांचे मत

What to believe in the virtual world ?; Commentary on online study | आभासी जगात कशावर विश्वास ठेवावा?; ऑनलाइन अभ्यासावर भाष्य

आभासी जगात कशावर विश्वास ठेवावा?; ऑनलाइन अभ्यासावर भाष्य

Next

- सीमा महांगडे

मुंबई : आॅनलाइनच्या आभासी जगात आपण कशावर विश्वास ठेवावा ही आपली जबाबदारी असून, आपण कशावर विश्वास ठेवायला हवा आणि कशावर नाही तरच आपण इंटरनेटवरील असुरक्षित गोष्टींपासून सुरक्षित राहू शकतो आणि अधिक सावध होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया कूल किड सोनियाने दिली. रिस्पॉन्सिबल नेटिजन्स या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या फेसबुक सेशनमध्ये तिने आपले मत नोंदवले. लॉकडाउनच्या निमित्ताने शाळांमध्ये आणि विविध क्लासेस, उपक्रम यांमध्ये गुंतलेली मुले या काळात इंटरनेट आणि आॅनलाइनच्या सर्वाधिक सहवासात आलेली आहेत. अशा वेळी मोठ्यांप्रमाणेच घरात क्वारंटाइन झालेली मुले ही मोठ्यांपेक्षा अधिक व्यवस्थित रीतीने ही सगळी परिस्थिती हाताळत असल्याचे मत रिस्पॉन्सिबल नेटिजन्सच्या कूल किड्सने नोंदवले आहे.

लॉकडाउनच्या काळात क्वारंटाइन झालेली ही मुले आॅनलाइन अभ्यासासोबतच नवीन संशोधन पेपर आणि गोष्टी याबद्दल वाचणे, अधिकाधिक विविध प्रकारची पुस्तके वाचणे, मोठ्यांना घरकामात मदत करणे, सोबत आपले छंदही आॅनलाइन स्वरूपात जोपासणे या साऱ्या गोष्टी करत आहेत. मात्र हे सारे आॅनलाइन करताना आपली आॅनलाइन सुरक्षितता कशी अबाधित राखली जाईल, त्यासाठी काय करणे आवश्यक आहे याच्या महत्त्वपूर्ण आणि हटके टीप्सही मुलांनी रिस्पॉन्सिबल नेटिजन्सच्या कूल किड्स इन क्वारंटाइनमध्ये शेअर केल्या आहेत.

लर्न फ्रॉम होम करताना सोशल मीडिया, इंटरनेट आणि नवे तंत्रज्ञान याचा विद्यार्थ्यांनी सुरक्षितरीत्या वापर कसा करावा याबद्दल सांगताना आपली माहिती कोणत्याही व्यक्तीशी शेअर करू नये, आपला पासवर्ड सुरक्षित ठेवावा, आपण ज्या साइटवर माहिती शोधत आहोत ती साइट सुरक्षित आहे का, याची खात्री करून घ्यावी, अशा टीप्स या सेशनमध्ये सहभागी मुलांनी दिल्या.

आपले छंद आॅनलाइन स्वरूपात जोपासताना आपली सुरक्षितता कशी अबाधित राखली जाईल, त्यासाठी काय करणे आवश्यक आहे.

Web Title: What to believe in the virtual world ?; Commentary on online study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.