- सीमा महांगडेमुंबई : ‘सर्व शिक्षा अभियान’अंतर्गत महाराष्ट्र सरकारतर्फे दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांना नवी पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. मात्र, शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर त्यांस्र२ काय होते? ती मोफत पुस्तके विद्यार्थ्यांकडून परत घेतली जातात का? अनेकदा ती रद्दीच्या दुकानांत विकली जातात, असे प्रकार समोर आले आहेत. यावर उपाय म्हणून यंदा शिक्षण विभागानेच शाळांना मोफत पाठ्यपुस्तकांसंदर्भात सूचना दिल्या. मात्र, पुन्हा या साऱ्याचा भार शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर आल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे. सोबतच पाठ्यपुस्तकांच्या अतिरिक्त साठवणुकीसाठीही व्यवस्था करण्यासही परवानग्या द्या, अशी मागणी होत आहे.वर्षाच्या सुरुवातीला सर्व शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटप केल्यावर, शाळांनी आता वार्षिक परीक्षा झाल्यानंतर पुस्तके परत घेण्याचे निर्देश दिले. ज्या रजिस्टरमध्ये मोफत पाठ्यपुस्तक वाटप केल्याच्या नोंदी केल्या आहेत, त्यातच ती परत घेतल्याच्या नोंदी करण्याच्या सूचना शाळांना शिक्षण विभागाने दिल्या. परत आलेली पुस्तके सुरक्षित जागी ठेवून, आग, पाणी, वाळवीपासून त्यांचे संरक्षण कसे होईल, याची खबरदारीही शाळांना घ्यावी लागणार आहे.अनुदानित शाळांना दरवर्षी सर्व शिक्षा अभियानांतर्गत नवीन पुस्तके मिळतात. त्यामुळे अशा शाळांनी मुलांकडून जमा केलेली पुस्तके विनाअनुदानित शाळांकडे हस्तांतरित करावी, जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांचा फायदा होईल, ही पुस्तके तिसºयांदा न वापरता त्यांची नोंदणी करून विक्री करावी, असे निर्देशही शिक्षण विभागाने दिले आहेत. यातून आलेली रक्कम शिक्षण निरीक्षक/ मुख्याध्यापक/ सचिव यांच्या सर्व शिक्षाच्या संयुक्त खात्यावर जमा करून, शालेय गरजेसाठी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या सर्वांचा भार मुख्याध्यापक, शिक्षकांवरच येईल. हे शाळाबाह्य काम असल्याचे मुख्याध्यापक संघटनेचे म्हणणे आहे. सर्व पुस्तके जमा करण्यासाठी शाळांना पुन्हा अतिरिक्त खोल्या लागतील, त्याची सोय करावी, अशी मागणीही केली.
सर्व शिक्षा अभियानातील पुस्तकांचे करायचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:45 AM