Join us

'दिल्लीतून काय बोलताय, महाराष्ट्रात येऊन बोला'; शिवसेनेचं पुन्हा नवनीत राणांना डिवचलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 1:53 PM

उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता नवनीत राणा यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई- मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला आलेले पळून गेले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्यावर टीका केली. मुंबईतील बीकेसी मैदानात शनिवारी शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यासह राणा दाम्पत्यावरही निशाणा साधाला. 

उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता नवनीत राणा यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाईल आणि तेव्हा रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले तर त्यांना मी कसे वाटते असे विचारणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितले. 

कोणताही गुन्हा न करता तुरुंगात टाकल्याच्या दुःख काय असते हे त्यांना विचारणार आहे. ती वेळही लवकरच येणार असल्याचं नवनीत राणांनी सांगितले. तसेच जेव्हा तुमची सत्ता जाईल आणि तुमच्या घरातील महिला तुरुंगात जाईल. तेव्हा मी विचारणार तुम्हाला कसे वाटते, अशी टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

नवनीत राणांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील निशाणा साधला आहे. दीपाली सय्यद ट्विट करत म्हणाल्या की, तुमच्या सारखे खोटे कागद पत्र वापरून रश्मी ठाकरेंना निवडणुक लढण्याची सवय नाही आणि बाप लपवण्याची पद्धतही नाही. दिल्लीतून काय बोलता महाराष्ट्रात येऊन बोला... नाटक कंपनी, असं दीपाली सय्यद म्हणाल्या.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी काल गदा हातात न घेता त्याला करंट लागत असल्यासारखे वर्तन केले. उद्धव ठाकरेंनी गदेचा अपमान केला. मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेत शेतकरी, बेरोजगारी, लोडशेडिंगबद्दल काहीही उल्लेख केला नाही. फक्त दुसऱ्यांवर बोलण्यासाठी ती सभा होती. अडीच वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री विदर्भ, मराठवाड्यात गेल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलं. पण त्यांच्या दौऱ्याचा फक्त एकतरी व्हिडीओ त्यांनी जाहीर करावा. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनंतर तिप्पट प्रमाणात राज्यात बेरोजगारी वाढली आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांवर एक शब्द बोलले नाहीत, अशी टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

टॅग्स :नवनीत कौर राणाउद्धव ठाकरेशिवसेना