Join us

झोपडपट्टीसाठी कोणती कोणती कागदपत्रे विचारात घेतली जाणार? वेळ खूप वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 8:45 AM

मिळणारी माहिती ही अचूक व विश्वासार्ह असते. त्यामुळे परिशिष्ट 2 साठी लागणार वेळ खूप कमी झाला आहे. 

विद्युत देयक टाटा, अदानी, बेस्ट व एमएसईबी या विद्युत पुरवठादार संस्थांकडून त्यांची विद्युत देयकाची आवश्यक माहिती एपीआयद्वारे स्वयंचलित परिशिष्ट 2 प्रणालीमध्ये घेतली आहे. यामध्ये सन 2000 पूर्वीची माहिती, सन 2000 ते 2019 ची माहिती व सध्याची माहिती एका क्लिकद्वारे प्राप्त होते. यामध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय विद्युत देयकाची पडताळणी होते. मिळणारी माहिती ही अचूक व विश्वासार्ह असते. त्यामुळे परिशिष्ट 2 साठी लागणार वेळ खूप कमी झाला आहे. 

मतदान ओळखपत्र परिशिष्ट 2 साठी निवडणूक आयोगाची सन 2000 पूर्वीची मतदार यादी, सन 2000 ते 2011ची मतदार यादी व सध्याची मतदार यादी या आवश्यक आहेत. पण त्या सर्व मतदार याद्या या स्कॅन स्वरुपात होत्या. त्या सर्व मतदार याद्या ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन (ओसीआर) द्वारे रुपांतरित करून यापैकी कोणत्याही झोपडीधारकाची माहिती अगदी सहजपणे शोधता येते. सन 2000 पूर्वीची मतदार यादी, सन 2000 ते 2019 ची मतदार यादी व सध्याची मतदार यादी या तिन्ही ठिकाणची माहिती त्याच्या मूळ स्कॅन पीडीएफसह शोधता येते. यामध्ये मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधील माहिती शोधता येते.

आधारकार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूडीएआय) कडून गृहनिर्माण विभागामार्फत आधार पडताळणी करण्यासाठी एपीआय घेण्यात आली आहे. यामार्फत बायोमेट्रिक अथवा आधार नंबर टाकून झोपडीधारकाची आधार पडताळणी केली जाते. यामुळे एका झोपडीधारकास एकपेक्षा अधिक लाभ मिळणार नाही, याची खात्री मिळते. झोपडीधारकाची माहिती आधारही तपासून पाहता येते. 

गुमास्ता परवाना झोपडीचा वापर हा व्यावसायिक कारणासाठी होत असेल तर त्याला मुंबई महानगरपालिकेचे गुमास्ता परवाना हा पुरावा म्हणून सादर करावा लागतो. मुंबई महानगरपालिकेकडून गुमास्ता परवानाविषयक माहिती पडताळण्यासाठी एपीआय स्वरुपात उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे व्यावसायिक झोपडपट्टीधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. 

2000 सर्व्हे पावती सन 2000 ला मुंबई महानगरपालिकेने केलेल्या सर्व्हे पावतीचा डेटा स्वयंचलित परिशिष्ट 2 प्रणालीबरोबर एकत्रित केला गेला आहे. त्यामुळे 2000 सर्व्हे पावतीची माहिती शोधता येते व त्याची पडताळणी करून पात्रता निश्चित करता येते. खरेदी-विक्री झाली असल्यास अॅग्रिमेंट एखाद्या झोपडीची खरेदी विक्री झाली असल्यास त्याची पडताळणी अॅग्रिमेंटद्वारे केली जाते. नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या डेटा बरोबर स्वयंचलित परिशिष्ट 2 प्रणालीबरोबर एकत्रित केला गेला आहे. त्यामुळे खरेदी विक्री झाली असल्यास अॅग्रिमेंट पडताळणी कमी वेळेत करता येते.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबईच्या वेबसाईटला भेट द्याः http://sra.gov.in/

टॅग्स :झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण