मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील उड्डाणपुलांवरून वाहतूक वेगवान होत असली, तरी त्याखालील जागेची रया गेली आहे. मध्य मुंबईसह पूर्व उपनगरात उड्डाणपुलाखाली जागेच्या सुशोभीकरणाचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांत या जागांचा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे आहेत त्या जागांवर महापालिकेने सुशोभीकरण करावे आणि त्याची देखभाल-दुरुस्ती करावी; यावर मुंबईकरांनी जोर दिला आहे.
मुंबई शहर ९८पूर्व उपनगर १२७पश्चिम उपनगर १७८
जे.जे. उड्डाणपुलाखालील जागेचा वापर गर्दुल्ले, भिकारीच जास्त प्रमाणात करतात. वाहने उभी करण्याबरोबरच येथे फेरीवाल्यांचाही राबता असल्याचे दिसून येते.
गोरेगाव परिसरातील आरे परिसरातील उड्डाणपुलाखाली भंगारातील गाड्या उभ्या केल्याने तेथे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. येथून जाताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.