Join us

अभिनेता असला म्हणून काय झाले, सलमान खान प्रकरणी तरुणांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 7:06 AM

वीस वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर सत्र न्यायालयाने दहा हजारांचा दंड आणि पाच वर्षांची शिक्षा सुनावली.

मुंबई - वीस वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर सत्र न्यायालयाने दहा हजारांचा दंड आणि पाच वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आले. याच पार्श्वभूमीवर मुंबईकर तरुणांनी आपली मते ‘लोकमत’कडे नोंदविली असून, ‘सगळ्यांना नियम, कायदे सारखेच’, म्हणत बॉलीवूडला फटका बसल्याचे मत नोंदवले आहे.मुंबईकर असलेल्या दीपेश वेदक याने सांगितले की, न्याय व्यवस्था ही सर्वांसाठी समान आहे. मग तो तुमचा आवडता अभिनेता का होईना. सलमानला शिक्षा सुनावली ती योग्यच आहे. सलमानसारखे अनेक अभिनेते कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकून तुरुंगात जाऊन त्यांनी शिक्षा पूर्ण केली. त्यामुळे सलमान खानला झालेली शिक्षा त्याने पूर्णपणे भोगावी.प्रियदर्शनी सावंत हिने सांगितले, २० वर्षांपूर्वी काळवीटला मारल्याप्रकरणी सलमानविरुद्ध खटला सुरू होता. आता या प्रकरणाचा निकाल जाहीर झाला असून तो योग्य लागला आहे. सद्य:स्थितीला प्राण्यांच्या काही प्रजाती लुप्त होण्याचा मार्गावर आहेत. त्यात अशा प्रकारे प्राण्यांची हत्या करण्यात आली तर संपूर्ण अन्नसाखळी कोलमडून जाईल. परंतु, ५ वर्षांसाठी सलमान खान तुरुंगात गेला तर याचा फटका हा बॉलीवूड चित्रपटसृष्टीला नक्कीच बसणार आहे. कारण सलमान खानने बरेच चित्रपट साइन केलेले आहेत. अंजली हेगडे हिच्या म्हणण्यानुसार, सलमान खानला ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ प्रकरणात जास्त शिक्षा झाली पाहिजे होती. मात्र, त्यात तो निर्दोष सुटला. परंतु, काळवीट प्रकरणी त्याला शिक्षा झाली हे योग्यच आहे. आता सलमान खान किती दिवस तुरुंगात राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहील.हर्षल जाधव याने सांगितले, काळवीट प्रकरणात सलमानला झालेली शिक्षा योग्यच आहे. मात्र ज्याप्रकारे मुक्या प्राण्यांच्या हत्येमध्ये सलमानला शिक्षा झाली त्याचप्रकारे ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणातही शिक्षा होणे गरजेचे होते. सलमानला झालेल्या शिक्षेतून सर्वांना समान न्याय हेच दिसून आले आहे. या प्रकरणामुळे न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास वाढेल हे नक्कीच. परंतु सलमानला झालेल्या शिक्षेची अंमलबजावणी योग्यरीत्या होणे गरजेचे आहे.ंचंगळवादात अडकलेल्यांसाठी धडाकाळविटांची शिकार करणारा बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला अखेर २० वर्षांनी शिक्षा झाली. सेलीब्रिटी म्हणून सोडून देणे चुकीचेच आहे, असे माझे ठाम मत आहे. कायदा सर्वांना समान आहे. त्यामुळे चूक केल्यावर शिक्षा व्हायलाच हवी.सलमानच्या शिक्षेमुळे स्वत:ला वेगळे म्हणवून घेत असलेल्या सेलीब्रिटींनी व आजच्या चंगळवादामध्ये अडकलेल्या युवकांनी धडा घेण्याची गरज आहे, असे मत नुपूर गोसावी याने व्यक्त केले.‘नो बडीस् अबाव्ह द लॉ’‘नो बडीस् अबाव्ह द लॉ.’ प्रत्येक वेळेला पैसे देऊन काम होत नाही. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत देशातील सर्व वन्यजीव हे संरक्षित आहेत. या प्राण्यांना मारणे म्हणजे गुन्हा आहे. वन्यजीव प्राण्यांना पाळणे, शिकार करणे, तस्करी करणे हा गुन्हा आहे. हा गुन्हा करताना पकडले गेले तर कमीत कमी ३ वर्षांची आणि जास्तीत जास्त ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. सलमान खान प्रकरणावरून कायदा सर्वांना सारखा असल्याचे दिसून येते.- अंकित व्यास, स्वयंसेवक, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो

टॅग्स :सलमान खानकाळवीट शिकार प्रकरणमुंबई