'त्या' ब्ल्यू फिल्मचं काय झालं?; पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 02:08 PM2019-09-30T14:08:04+5:302019-09-30T14:55:01+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचे मनसेच्या पक्षातील नेत्यांनी जाहीर केले होते. त्यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची अधिकृत घोषणा केली.
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचे मनसेच्या पक्षातील नेत्यांनी जाहीर केले होते. त्यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची अधिकृत घोषणा केली. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीची पहिली प्रचार सभा 5 आँक्टोबरला होणार असून त्यानंतर विविध मनसेच्या प्रचाराचा धडाका सुरु होणार असल्याचे देखील राज ठाकरे यांनी जाहीर केले. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने 'ब्लू प्रिंट' ऐवजी 'ब्लू फिल्म' हा शब्द उच्चारल्याने मी ब्लू फिल्म करत नसल्याचे मिश्कील उत्तर दिले.
राज ठाकरे वांद्रयातील एमआयजी क्लबमध्ये आज इच्छुक उमेदवारांचा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी पत्रकार देखील उपस्थित होते. मनसे आगामी विधानसभेत किती जागा लढवणार यासह विविध प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आले. मात्र एका पत्रकाराने प्रश्न विचारताना ब्लू प्रिंट ऐवजी ब्लू फिल्म हा शब्द विचारल्याने मी ब्लू फिल्म करत नसल्याचे मिश्कील उत्तर दिल्याने उपस्थितांना हसू अनावर झाले.
राज ठाकरेंनी आज वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये इच्छुक उमेदवारांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात मंत्रालयात आत्महत्या केलेले धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी आज राज ठाकरे यांच्या उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. त्याचप्रमाणे नाशिक महानगर पालिकेमधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातार यांनी देखील मनसेत प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे मनसे नेमक्या किती जागा लढवणार हे योग्यवेळी सांगण्यात येईल. आज पक्षप्रवेशासाठी पत्रकारांना बोलावलं होतं असं राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज्यातील राजकीय वातावरण तापवलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं पुन्हा एकदा राज यांची ठाकरी तोफ धडाडणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे 'महाराष्ट्र विधानसभा २०१९' निवडणुकीच्या प्रचाराची पहिली सभा ५ ऑक्टोबर २०१९ रोजी घेणार.#मनसेदणका#रेल्वेइंजिनpic.twitter.com/NQLQBVfvDn
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) September 30, 2019