‘सिंगल’ हुए तो क्या हुआ ?

By admin | Published: February 10, 2016 04:06 AM2016-02-10T04:06:06+5:302016-02-10T04:06:06+5:30

‘व्हॅलेंटाइन डे’ जसजसा जवळ येतो, तसतसे प्रेमाला उधाण यायला लागते, पण ज्यांना व्हेलेंटाइन पार्टनर नसतो, त्यांनी हताश होण्याचे काहीच कारण नाही. कारण ‘सिंगल हुए तो क्या हुआ!

What happened if 'single' happened? | ‘सिंगल’ हुए तो क्या हुआ ?

‘सिंगल’ हुए तो क्या हुआ ?

Next

- शुभांगी विरकर,  मुंबई
‘व्हॅलेंटाइन डे’ जसजसा जवळ येतो, तसतसे प्रेमाला उधाण यायला लागते, पण ज्यांना व्हेलेंटाइन पार्टनर नसतो, त्यांनी हताश होण्याचे काहीच कारण नाही. कारण ‘सिंगल हुए तो क्या हुआ!’ म्हणत, तुम्हीही व्हॅलेंटाइन तुमच्या पद्धतीने साजरा करू शकता आणि ‘व्हॅलेंटाइन वीक’ची मजा लुटू शकता.
‘व्हॅलेंटाइन डे’ला अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कपल्स व्हॅलेंटाइन कसा करायचा, या प्लॅनिंगमध्ये गुंग आहेत, तर काही जण कॉलेजच्या कट्ट्यावर ‘सिंगल’ असल्यामुळे निराश आहेत, पण सिंगल असण्यातही काही गैर नाही.
सिंगल राहूनही तुम्ही ‘व्हेलेंटाइन डे’ तितक्याच उत्साहात साजरा करू शकता. ‘नो कमिटमेंट’ आणि ‘नो लिमिटेशन’ असे काहीसे असल्यामुळे व्हेलेंटाइनचा आठवडा ‘सिंगल्स’ हवा तसा घालवू शकतात.
‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे ‘प्रेमाचा दिवस’ तो तुमच्या जवळच्या माणसांसोबत घालवणे आवश्यक असते. तेव्हा जवळचे मित्र, मैत्रीण आणि आप्तेष्टांनी एकत्र येऊन काहीतरी फर्स्ट क्लास प्लॅन बनवा.

‘ सिंगल’ असणे चांगलेच!
‘सिंगल’ असणे म्हणजे, कॉलेजच्या रंगीबेरंगी दुनियेत मागे पडत असल्याचे अनेकांना वाटते, पण हा गैरसमज दूर करून सिंगल असणेही चांगले हे डोक्यात ठेऊन, यंदाचा ‘व्हॅलेंटाइन डे’ स्पेशल बनवा.

‘सिंगल्स’ डे प्लॅनर
‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यासाठी मस्त बेत आखा. यंदा १४ फेब्रुवारी नेमका रविवारी आल्यामुळे शनिवारी रात्री नाइट आउट विथ फ्रेंडसचा प्लॅन करू शकता.
एकटे भटकण्याची आवड असेल, तर ‘अलोन टुरिझम’ करा. सध्या एकटे फिरणे ट्रेंड बनला आहे, तो सिंगल्सनी ‘व्हॅलेंटाइन डे’ला फॉलो करायला काहीच हरकत नाही.
ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांनी ट्रेकिंगला जायला काहीच हरकत नाही, शिवाय नाटक, सिनेमाची आवड असणाऱ्यांनी त्यांचा आस्वाद घ्यावा.

Web Title: What happened if 'single' happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.