अप आणि डाऊन मार्गावर काय झाले ?

By सचिन लुंगसे | Published: June 1, 2024 07:11 PM2024-06-01T19:11:39+5:302024-06-01T19:11:51+5:30

Mumbai News: मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावर प्रवाशांचे अतोनात हाल झाले. विशेषत: कुर्ला, सायन, घाटकोपर, दादरसारख्या मोठया रेल्वे स्थानकांवर प्रवासी अक्षरश: ताटकळत उभे असल्याचे चित्र होते. दाखल होणा-या लोकल विलंबाने आणि खच्चून भरलेल्या असल्याने प्रवाशांच्या त्रासात भरच पडत होती.

What happened on the way up and down? | अप आणि डाऊन मार्गावर काय झाले ?

अप आणि डाऊन मार्गावर काय झाले ?

 मुंबई - मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावर प्रवाशांचे अतोनात हाल झाले. विशेषत: कुर्ला, सायन, घाटकोपर, दादरसारख्या मोठया रेल्वे स्थानकांवर प्रवासी अक्षरश: ताटकळत उभे असल्याचे चित्र होते. दाखल होणा-या लोकल विलंबाने आणि खच्चून भरलेल्या असल्याने प्रवाशांच्या त्रासात भरच पडत होती.

ठाण्याहून मुंबईत येणा-या बहुतांशी लोकल या दादर आणि लोअर परळपर्यंत चालविल्या जात होत्या. कुर्ल्याला दाखल होणा-या लोकलमधून प्रवाशांना दादर, लोअर परळ आणि भायखळा गाठण्यासाठी दुसरी लोकल पकडावी लागत होती. कुर्ला रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक  एकवर  ठाणे दिशेकडील धीमी लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना खुप वेळ वाट पाहवी लागत होती. तर जलद मार्गावर फलाट क्रमांक ५ वरही लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत होते. फलाट क्रमांक ४ वरून शहरात येणा-या नागरिकांना तर अक्षरश: गर्दीमधून कोंबून प्रवास करावा लागत होता. त्यात बरचसे मुंबईकर कुटूंबासमवेत बाहेर पडल्याने सोबत असलेल्या चिमुकल्यांसह महिलांना ब्लॉकचा मोठा मनस्ताप झाल्याचे चित्र होते.

भायखळ्यापासून लोअर परळ, दादर, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपरसह पुढील सर्वच रेल्वे स्थानकांत अप आणि डाऊन मार्गावर प्रवाशांची गर्दी कायम होती. या स्थानकांबाहेरील बस स्टॉपवरही बेस्टला गर्दी कायम असल्याने मुंबईकरांना लटकून प्रवास करावा लागत होता. दुपारचा तुरळक काळ वगळला तर सकाळी आणि सायंकाळी ब्लॉकचा प्रवाशांना मोठा फटका बसला होता.
 
बुलेट पॉइंटस
- कुर्ला रेल्वे स्थानकातील जलद आणि धीम्या मार्गावरील इंडीकेटर अनेकवेळ बंद होते.
- इंडीकेटरवर दाखविण्यात आलेली वेळ आणि लोकल दाखल होणारी वेळ यात फरक होता.
- कुर्ला येथील फलाट क्रमांक सहा आणि सातवर लोकलची वाट बघणा-या प्रवाशांचा अक्षरश: घाम निघत होता.
- पहिल्या दर्जाचे डबे शनिवारी आणि रविवारी सहसा रिकामे असतात. मात्र शनिवारी हे डबेदेखील भरून वाहत होते.
- काही प्रवासी तर माल डब्यातून प्रवास करत होते.
 

Web Title: What happened on the way up and down?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.