विद्यार्थी सुरक्षा उपायांचे काय केले? शाळांतील कार्यवाहीबाबत सहसंचालकांनी मागविला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 08:23 AM2024-11-07T08:23:33+5:302024-11-07T08:23:50+5:30

School News: राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे निर्देश शाळांना शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, या उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याचे पुढे आले आहे.

What happened to student safety measures? The Joint Director called for a report on the proceedings in the schools | विद्यार्थी सुरक्षा उपायांचे काय केले? शाळांतील कार्यवाहीबाबत सहसंचालकांनी मागविला अहवाल

विद्यार्थी सुरक्षा उपायांचे काय केले? शाळांतील कार्यवाहीबाबत सहसंचालकांनी मागविला अहवाल

 मुंबई - राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे निर्देश शाळांनाशिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, या उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याचे पुढे आले आहे. या संदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल ७ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त कार्यालयाचे शिक्षण सहसंचालक दिलीप जगदाळे यांनी शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत.

बदलापूर येथील घटनेनंतर शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यात शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे,  सखी-सावित्री समितीच्या तरतुदींचे पालन करणे, विद्यार्थी सुरक्षा समिती नियुक्त करणे आदीबाबत विविध तक्रारी, आक्षेप नोंदवण्यात आल्याचे जगदाळे यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, शिक्षण अधिकाऱ्यांनी कारवाई प्रलंबित ठेवली असल्यास किंवा कारवाई केलीच नसल्यास त्याबद्दल खुलासा घेऊन तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सीसीटीव्ही बंद, समित्या कागदावरच
- अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही बंद आहेत, तर बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात नाही. त्याचे बॅकअप ठेवले जात नाही. विविध समित्या केवळ कागदावर स्थापन केलेल्या आहेत. 
- निरीक्षणासाठी समित्यांचे अहवाल उपलब्ध नाहीत. स्कूलव्हॅन सुरक्षेसंबंधी उपाय केलेले नाहीत. कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी नाही. अशा तक्रारी आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरक्षेसंबंधी सद्य प्रगतीच्या तपशिलासह उपाययोजनांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचेे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: What happened to student safety measures? The Joint Director called for a report on the proceedings in the schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.