शिवसेनेच्या सुनावणीत आज काय घडलं? ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 07:39 PM2023-11-21T19:39:24+5:302023-11-21T19:42:38+5:30
शिवसेनेतील आमदार अपात्रतेवरील सुनावणीला आजपासून सुरुवात झाली आहे.
मुंबई- शिवसेनेतील आमदार अपात्रतेवरील सुनावणीला आजपासून सुरुवात झाली आहे. आज विधीनसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. आज दिवसभर ही सुनावणी चालली, या सुनावणीत काय घडलं याची माहिती ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी दिली आहे.
उद्या पुन्हा दोन सत्रात ही सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात सुनिल प्रभु यांची साक्ष नोंदवली. ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी सुनिल प्रभु यांना प्रश्न विचारले, यावर प्रभु यांनी उत्तर दिली. याबाबत बोलताना आमदार अनिल परब म्हणाले, त्यांनी योग्य पद्धतीने उत्तर दिली. त्यांनी सुरुवातीलाच मराठी उत्तर देणार असं सांगितलं. सुरुवातील त्यांनी इंग्रजी ट्रान्सलेट करायला सुरुवात केली होती, पण ते मराठीत सांगतात तस ट्रान्सलेट होत नाही असं समोर आलं. म्हणून आमच्या वकीलांनी आक्षेप घेतला, मराठीत जसच्या घ्यावं अशी आम्ही मागणी केली. पुढं जसाच्या तसा अर्थ गेला पाहिजे. यावेळी त्यांनी डॉ.बाबासाहेबांचा यात उल्लेख टाळला. यावरही आमच्या वकीलांनी आक्षेप नोंदवला."
"यात आता वेळकाढुपण सुरू असल्याचं समोर आलं आहे, पण कितीही वेळकाढुपणा केला तरीही त्यांना ३१ डिसेंबरच्या आत त्यांना जेजमेंट द्यायचं आहे. त्यामुळे आमच्याकडून सुनिल प्रभुंचा आयविटनेस दिला आहे, त्याची उलट तपासणी लवकरात लवकर संपली पाहिजे. याच कारण असं की अजून त्यांचे विटनेस घ्यायचे आहेत. ते वेळकाढुपणाचे धोरण स्विकारतील आणि मग कोर्टाकडे सुनावणी संपली नसल्याचे सांगतिल आणि पुन्हा वेळ वाढवून द्या अशी मागणी करु शकतात म्हणून आम्ही कमीत कमी वेळात हे प्रकरण संपल पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहे, असंही अनिल परब म्हणाले.
३१ तारखेच्या आत सुनावणी संपवायची आहे
आजच्या सुनावणीत सुनिल प्रभु यांनी अॅफीडेव्हीटबाबत प्रश्न विचारले होते, त्यांनी योग्य उत्तर दिली आहेत. सध्या वेळकाढुपणा सुरू आहे. परंतु त्यांनी ३१ तारखेच्या आत सुनावणी संपवायची आहे, असा टोलाही परब यांनी लगावला.