Join us

कॉलेजच्या पोरा-पोरींचे कॉफी हाऊसमध्ये चालतंय तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 11:24 AM

कॉलेजलगत असलेल्या छोट्या-मोठ्या टपऱ्यांसह विविध कॉफी हाउसमध्ये कॉलेजियन्सच्या तासन्तास गप्पा रंगताना दिसतात. 

मुंबई : कॉलेजलगत असलेल्या छोट्या-मोठ्या टपऱ्यांसह विविध कॉफी हाउसमध्ये कॉलेजियन्सच्या तासन्तास गप्पा रंगताना दिसतात.  मुंबईच्या विविध कॉफी हाउससह विविध फूड ब्रँडच्या आउटलेटमध्ये महागड्या फूडसोबत बसण्याला मर्यादा नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता भासत नाही. काही छोट्या स्नॅक कॉर्नरमध्ये व्यावसायिकांकडून पैसे आकारून बसण्याची व्यवस्था करण्यात येते.

पोरा-पोरींना गप्पा मारण्यासाठी वेळेनुसार पैसे

काही ठिकाणी गप्पा मारण्यासाठी वेळेनुसार पैसे आकारण्यात येत आहे. कुठे १००, तर कुठे ५०० रुपयेही आकारण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी खाद्यपदार्थांची किंमत वाढवून त्यामागे पैसे आकारण्यात येतात.

कॉलेज कट्टा अन् बरंच काही

बड्या कॉलेजच्या आवाऱ्यातील कॉलेज कट्ट्यावरच गप्पांची मैफल रंगताना दिसते.

अशा ठिकाणी पोलिसांचे लक्ष ...

कुठल्या कॉफी हाउसमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचे समजताच पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. मुंबईत याचे प्रमाण कमी आहे. तरीही कुठेही गैरप्रकार होऊ  नये म्हणून पोलिस सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असतात.

या परिसरात कॉफी हाउसचा धंदा जोरात

मुलुंड, पवई, दादर, परळ, वांद्रे, अंधेरी, कुलाबा, गिरगाव, मरीन ड्राइव्हसह विविध बड्या कॉलेजच्या आवारात कॉफी हाउसचा धंदा तेजीत आहे. कॉलेजच्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी कॉफी हाउसला फिल्मी टचसह विविध शक्कल लढवताना दिसतात.