Join us

शुद्ध हवा म्हणजे काय रे भाऊ ? हवा गुणवत्ता निर्देशांक मोजतात तरी कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 1:32 PM

बांधकाम मजूर, झोपडपट्ट्यांमध्ये दाटीवाटीने राहणारे (असुरक्षित लोकसंख्या) म्हणजे ज्या ठिकाणी फारशी मोकळी हवा नसते.

मुंबई : हवा गुणवत्ता निर्देशांक हे वायू प्रदूषक यांच्या सभोवतालच्या एकाग्रता मूल्यांवर आधारित एक साधन आहे. याचे चांगले, समाधानकारक, मध्यम प्रदूषित, खराब, अत्यंत खराब आणि गंभीर असे वर्गीकरण केले जाते. विशेषतः एखाद्या क्षेत्रात ‘ खराब ते गंभीर ’ श्रेणीत असताना हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक बिघडल्याने संसर्ग झालेल्या लोकांमध्ये एखादी विकृती येणे किंवा मृत्यूचे प्रमाण वाढू शकते.  बांधकाम मजूर, झोपडपट्ट्यांमध्ये दाटीवाटीने राहणारे (असुरक्षित लोकसंख्या) म्हणजे ज्या ठिकाणी फारशी मोकळी हवा नसते. दैनंदिन जीवनात काम करताना प्रदूषण आजूबाजूला असते. तसेच ज्यांना आधीपासूनच श्वसन विकार व्याधी आहे, ज्या व्यक्तींना दमा, अस्थमा, निमोनिया किंवा जुनाट श्वसन विकार आजार आहे, त्यांना हवेची गुणवत्ता घसरल्याने त्रास होतो.   

हवा गुणवत्ता निर्देशांक    संभाव्य आरोग्य परिणाम चांगला (०-५०)    कमी जोखीम समाधानकारक (५१-१०० )    असुरक्षित लोकसंख्येत श्वासोच्छ्वास घेण्याचा         किरकोळ त्रास. मध्यम  (१०१-२००)      असुरक्षित लोकसंख्येत श्वासोच्छ्वास किंवा    आरोग्याशी संबंधित इतर अस्वस्थता. खराब (२०१-३००)     दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास निरोगी तसेच    असुरक्षित लोकांमध्ये श्वास घेण्यास त्रास. अत्यंत खराब  (३०१-४००)     दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास निरोगी लोकांना    श्वसनाचे आजार तसेच असुरक्षित लोकांमध्ये    श्वसन आणि इतर आजार. गंभीर  (४०१-५००)     दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास निरोगी लोकांना    श्वसनाचे आजार तसेच  असुरक्षित लोकांमध्ये     श्वसन आणि इतर आजार.

टॅग्स :मुंबईप्रदूषण