Join us

राज ठाकरेंच्या आदेशानं मनसेचं 'घे भरारी' अभियान, काय आहे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 12:47 PM

येणाऱ्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार "घे भरारी"  हे अभियान राबविले जाणार आहे.

मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच सक्रीय दिसून येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात त्यांनी कोकण दौरा केला, येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत पक्षावाढीसाठी आणि आगामी निवडणुकांसाठी कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या. आता, मनसेकडून घे भरारी अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रीतल प्रत्येक मतदारसंघात पक्षवाढीसाठी काम केलं जाणर आहे. मेळावे आणि सभांच्या माध्यमातून मनसैनिक एकत्र येणार आहेत, अशी माहिती मनसेच सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली. 

मनसे पक्षवाढीसाठी कोण आडवा येईल, त्याला आडवे करा. त्यासाठी लागणारी सर्व ताकद दिली जाईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणातील मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले होते. तर, मुंबईत बुथप्रमुखांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं, त्यावेळी माझा प्रत्येक बुथप्रमुख हा राज ठाकरे असल्याचं ते म्हणाले होते. त्यावेळीही, त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे सूचवले होते. आता, मनसेकडून त्याच पार्श्वभूमीवर घे भरारी अभियान राबविण्यात येत आहेत. 

येणाऱ्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार "घे भरारी"  हे अभियान राबविले जाणार आहे. त्यानुसार, प्रत्येक विधानसभेमध्ये ठिकठिकाणी मेळावे आणि सभा घेतल्या जाणार आहेत. मूळ प्रश्नांना भरकवटण्याचा प्रयत्न अनेक पक्षांकडून केला जात आहे. जनतेच्या मुळ समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याच्यावर आवाज उठवणं या सर्व गोष्टींसाठी 'घे भरारी' अभियान होणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

दरम्यान, सध्या राज्यात महापुरुषांच्या अवमानप्रकरणावरुन लोकं रस्त्यावर उतरत आहेत. त्यातच, चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीची घटना घडली होती. या घटनेनंतर राज ठाकरेंनी मध्यस्थी करुन महाराष्ट्रातील जनतेला आवाहनही केलं होतं. आता, आगामी घे भरारी अभियानातही याच मुद्द्याचा विचार केला जाणार असल्याचं दिसून येतं.  

टॅग्स :मनसेमुंबईराज ठाकरेसंदीप देशपांडे