झोपडपट्टीच्या थ्रीडी छायाचित्राचा फायदा काय? ड्रोन मॅपिंग, एसआरएची आधुनिक प्रणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 08:28 AM2024-10-15T08:28:03+5:302024-10-15T08:28:17+5:30
मुंबईचे सीमित भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता घरांच्या तुटवड्याचा प्रश्न पुनर्विकासाच्या माध्यमातून सोडविता यावा यादृष्टीने राज्य शासनातर्फे पुनर्वसन नियमावली अधिकाधिक सुलभ करण्यावर भर दिला आत आहे.
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या 2030 सदनिकांकरीता सुमारे एक लाख तेरा हजार अर्जदारांचा लाभलेला प्रतिसादावरुन मुंबई शरातील परवडणाऱ्या दरातील घरांची वाढती मागणी अधोरेखित होते. मुंबईतील घरांच्या वाढत्या मागणीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुंबईचे सीमित भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता घरांच्या तुटवड्याचा प्रश्न पुनर्विकासाच्या माध्यमातून सोडविता यावा यादृष्टीने राज्य शासनातर्फे पुनर्वसन नियमावली अधिकाधिक सुलभ करण्यावर भर दिला आत आहे.
स्वयंचलित परिशिष्ट - 2 प्रणाली झोपडीधारकांची पात्रता करण्याकरिता बराच कालावधी (काही वर्ष) लागत होता. झोपडीधारकांना स्वतः पात्रता निश्चितेसाठी प्राधिकरणात वारंवार यावे लागते. ही प्रक्रिया कमी करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) स्वयंचलित परिशिष्ट 2 ही प्रणाली विकसित केलेली आहे. त्यामुळे पात्रता निश्चित करण्याचा कालावधी कमी होऊन काही दिवसांत पात्रता होणार आहे.
या प्रणालीचे फायदे : झोपडीधारकांची पात्रता लवकर निश्चित होईल. अतिक्रमणास आळा बसेल. मानवी हस्तक्षेप कमी होईल.
या प्रणालीकरिता प्रक्रिया पुढीलप्रमाणे : ड्रोन सर्वेक्षण ड्रोन मॅपिंगच्या साहाय्याने मुंबई, तसेच मंबई महानगर प्रदेशातील झोपडपट्टीचे सर्वेक्षण केले गेले आहे. ड्रोन सर्वेक्षणादवारे उच्च रिझोल्युशन प्रतिमा प्राप्त केल्या जातात. या उच्च रिझोल्युशन प्रतिमा झोपडपट्ट्यांची सध्याची स्थिती अतिशय अचूकपणे दर्शवितात. ड्रोन सर्वेक्षणामध्ये x,y अक्षावर 2-3 मीटर आणि 2 अक्षावर 6-9 मीटर अंतरापर्यंत अचूकता येते. प्रत्यक्ष झोपडपट्टीमध्ये न जात, तसेच अतिशय कमी वेळात ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले गेले आहे.
भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे मॅपिंग : उच्च रिझोल्युशन प्रतिमांच्या आधारे भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे प्रत्येक झोपडीचा पॉलिगॉन तयार केला जातो. या पॉलिगॉनला जिओ टॅग युनिक आयडी प्रदान केला जातो. भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे मॅपिंगमळे झोपडपट्टीतील अंदाजित झोपड्यांची संख्या निश्चित होते, तसेच याद्वारे बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे नियोजन, तसेच देखरेख करता येते.
थ्रीडी छायाचित्र
ड्रोन सर्वेक्षणाद्वारे मुंबई, तसेच मुंबई महानगर प्रदेशातील झोपडपट्टीचे थ्रीडी छायाचित्र ही घेतले आहे. या थ्रीडी छायाचित्राद्वारे झोपडीचे सद्यस्थिती स्पष्ट होते. थ्रीडी छायाचित्राद्वारे झोपडी किती मजल्यांची आहे, हे स्पष्टपणे दिसते, तसेच झोपडीचा वापर निवासी किंवा व्यावसायिक असल्याचेही समजते.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबईच्या वेबसाईटला भेट द्याः http://sra.gov.in/