कारागृहाबाहेर येण्यासाठी रजेचे कोणते कारण हवे? पॅरोल कसा मंजूर होतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 04:15 PM2023-09-04T16:15:58+5:302023-09-04T16:16:23+5:30

एखाद्या गुन्ह्यात शिक्षा लागल्यानंतर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना विविध कारणांसाठी संचित (हक्काची) आणि पॅरोल रजा मंजूर करण्यात येते.

What is the reason for leave to get out of jail How is parole granted | कारागृहाबाहेर येण्यासाठी रजेचे कोणते कारण हवे? पॅरोल कसा मंजूर होतो?

कारागृहाबाहेर येण्यासाठी रजेचे कोणते कारण हवे? पॅरोल कसा मंजूर होतो?

googlenewsNext

मुंबई :

एखाद्या गुन्ह्यात शिक्षा लागल्यानंतर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना विविध कारणांसाठी संचित (हक्काची) आणि पॅरोल रजा मंजूर करण्यात येते. या रजेचा कालावधी संपल्यानंतर त्या कैद्यांनी पुन्हा कारागृहात परत जायचे असते. कैद्याच्या रक्ताच्या नात्यातील कोणी आजारी असेल किंवा जवळची व्यक्ती मृत पावली असेल तर अशावेळी त्या कैद्याला रजा मिळते. अनेकदा याच रजेचा फायदा घेत कैदी पसार होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. 

कारागृह प्रशासन कैद्याचा अर्ज विभागीय आयुक्तांकडे पाठवितात. विभागीय आयुक्त त्या अर्जाची गंभीरता विचारात घेऊन संबंधित कैदी ज्या जिल्ह्याचा रहिवासी असेल त्या जिल्ह्याच्या गुन्हे शाखेकडे अभिप्रायासाठी पाठवितात. 

गुन्हे शाखेत तो अर्ज आल्यानंतर अर्जात नमूद करण्यात आलेले रजेचे कारण खरे आहे का? हे तपासले जाते. 

रजेचा कालावधी...
संचित रजेचा कालावधी १५ दिवसांचा असतो, तर पॅरोल रजेचा कालावधी १ महिन्याचा असतो. कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेकडे अर्ज करून पुन्हा रजा वाढवून घेता येते.

मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा चार पटीने कैदी
   राज्यात एकूण ६० कारागृह असून त्यामध्ये  २४ हजार ७२२ क्षमता असताना ४१ हजार १९१ कैदी आहेत. यामध्ये, मुंबई, पुणे, ठाण्यातील कारागृह सर्वाधिक हाऊसफुल आहेत. 
  यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा चार पटीने अधिक कैदी कोंबण्यात आले आहेत. 
   मुंबईच्या मध्यवर्ती म्हणजेच आर्थर रोड कारागृहात ८०४ ची क्षमता असताना ३ हजार ६२९ कैद्यांना ठेवण्यात आले आहे.

   संबधित पोलिस ठाणे त्या अर्जावरून त्या कैद्याच्या घरातील तसेच शेजारीपाजारी मंडळीचा जबाब नोंदवितात.
  पुन्हा अभिप्रायासह ते प्रकरण गुन्हे शाखेमार्फत विभागीय आयुक्तांकडे जाते. त्यानंतर रजा मंजूर होते. 
   एखाद्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याविरुद्ध आरोप सिद्ध झाल्यास कोर्टाकडून होणाऱ्या शिक्षेसोबत कैद्याला त्या कालावधीत रजा मिळण्याचा अधिकार देण्यात येतो. वर्षभरातून एकदा ही रजा मंजूर केली जाते. त्यासाठी तसेच महत्त्वाचे कारण देखील लागते. 
   कैद्याच्या रक्ताच्या नात्यातील कोणी आजारी असेल किंवा जवळची व्यक्ती मृत पावली असेल तर अशावेळी त्या कैद्याला रजा मिळते. त्यासाठी कैद्यास कारागृहाच्या प्रशासनाकडे रजेसाठी अर्ज करायचा असतो.

Web Title: What is the reason for leave to get out of jail How is parole granted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.