प्रेम म्हणजे काय रे भाऊ ? माय बोलीचा व्हिडिओ होतोय वायरल
By admin | Published: February 8, 2016 09:01 PM2016-02-08T21:01:45+5:302016-02-08T21:21:53+5:30
प्रेम म्हणजे काय? त्याबद्दल लोक काय विचार करतात हे जाणून घेण्यासाठी मुंबईतील २ वेड्यापीरांनी युट्युब वर माय बोली नावाचा चॅनेल सुरु केला आहे. त्यामधील काही व्हिडिओ खुपच वायरल झालेले दिसतात.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - सध्या जिकडेतिकडे प्रेमाचे संदेश सोशल माध्यमातून फिरत आहेत, वेगवेगळे व्हिडिओ वायरल होत आहेत, कोणा प्रेमाची खिल्ली उडवतानाचे तर कोण त्याला सपोर्ट करतानाचे असे व्हिडिओ रोज सोशल माध्यमात आपल्याला दिसतात. प्रेम म्हणजे काय? त्याबद्दल लोक काय विचार करतात हे जाणून घेण्यासाठी मुंबईतील २ वेड्यापीरांनी युट्युब वर माय बोली नावाचा चॅनेल सुरु केला आहे. त्यामधील काही व्हिडिओ खुपच वायरल झालेले दिसतात.
प्रत्येक वर्षी १४ फेब्रुवारीला सर्वजण प्रेम दिवस का साजरा करायचा याबद्दल वेगवेगळ्या कहाण्या ऐकायला मिळतील. हिर-रांजा, लैला-मजनु, संत वेलेंटाईन यांचे मेसेजेस एव्हाना सोशल मीडियावर फिरु लागले आहेत. पण युवा मुंबईतल्या दोन तरुणांनी तरुणांच्या मनातप्रेमाबद्दल नेमकी कोणती भावना आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय.
गुरुप्रसाद जाधव आणि सिद्धेश सावंत या माध्यमांमध्ये काम करणाऱ्या दोन तरुणांनी मायबोली या युट्युब चॅनलसाठी प्रेम दिवसानिमीत्त तरुण-तरुणींच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न केलाय. प्रेम म्हणजे फिरण, प्रेम म्हणजे गप्पा, प्रेम म्हणजे भांडण..माझं प्रेम ते तुमच्यासाठी लफडं,.. तुमचं प्रेम ते माझ्यासाठी जुगाड.. प्रेमाच्या व्याख्या चष्म्याचा नंबर बदलतो तशा सोयिस्कर बदलतात अशी वेगवेगळी काही अनपेक्षित उत्तरे त्यांना यानिमित्ताने मिळाली आहेत. त्यांनी बनविलेल्या या व्हिडिओचा प्रोमो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. १४ फेब्रुवारीला प्रेम दिवसाच्या निमित्ताने हा पूर्ण व्हिडीओ प्रेमरसिकांना मायबोली या युट्यूब चॅनलवर सविस्तर पाहता येणार आहे.