Join us

होळीपूजनाचा उत्तम मुहूर्त कोणता?... जुळून आलाय तिहेरी योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 1:24 PM

वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन करण्याच्या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला देशभरात होळीचा सण साजरा होतो. आज सकाळी ८.५८ वाजल्यापासून पौर्णिमा सुरू झाली असली, तरी भद्रा काळात होळीची पूजा करू नये.

मुंबईः वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन करण्याच्या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला देशभरात होळीचा सण साजरा होतो. आज सकाळी ८.५८ वाजल्यापासून पौर्णिमा सुरू झाली असली, तरी भद्रा काळात होळीची पूजा करू नये, असा सल्ला जाणकारांनी दिला आहे. शास्त्रानुसार यंदाच्या होळीला उत्तम योग जुळून आला आला आहे. त्यामुळे हा सण अधिक आनंददायी आणि शुभ ठरेल.

संध्याकाळी ७ वाजून ३७ मिनिटांनी भद्रा काळ संपतोय. त्यानंतर होळीचं पूजन करणं हितकारक आहे. पौर्णिमा ही तिथी, प्रदोष असणं आणि भद्रा काळ नसणं ही स्थिती होळीपूजनासाठी, होलिकोत्सवासाठी सर्वोत्तम मानली जाते. ती आज संध्याकाळी आहे. त्यामुळे ७.३७ आधी होळीपूजन न केलेलंच बरं. 

टॅग्स :होळी २०१८