Join us

आगीत भाजल्यानंतर आधी नेमकं काय करायला हवं? वाचा उपयुक्त माहिती…

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 10:10 AM

अपघातात किरकोळ किंवा गंभीररीत्या भाजल्यानंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घ्या.

मुंबई : शहर तसेच उपनगरात वेगवेगळ्या आगीच्या घटना सतत घडत असतात. या जाणून घेणे आवश्यक आहे.या अपघातात किरकोळ किंवा गंभीररीत्या भाजल्यानंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेणे आवश्यक आहे.

श्वास घेता येतोय का?

आगीच्या घटनेत एखाद्याला गंभीररीत्या भाजले असेल तर सर्वांत पहिल्यांदा जो व्यक्ती भाजला आहे, त्याला श्वास घेता येतो की नाही हे तपासून घ्यावे. तसेच त्याच्या शरीरावर कोणतेही दागिने, बेल्ट्स अथवा कोणत्याही घट्ट वस्तू  असतील तर त्या काढून टाकाव्यात.

प्राथमिक उपचार काय?

एखाद्या व्यक्तीला ज्या ठिकाणी भाजले आहे, तिथे त्याला कपड्याने झाका. जखम खोल नसल्यास तो भाग शक्य असल्यास १० मिनिटे तरी थंड पाण्याखाली ठेवा. तेल उडून भाजलेल्या त्वचेवर फोड आल्यास ते फोडू नका. 

जखम चोळू नका:

भाजलेली जखम चोळल्यास इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे ती डेटॉलने स्वच्छ करा आणि त्यावर अँटिबायोटिक ऑईंटमेंट लावा. कोरफड आणि कोको बटरदेखील लावू शकता.

घरगुती उपचार काय?

कोरफडीचा गर : कोरफडीचा गर भाजलेल्या जागेचा कोरडेपणा जात मऊपणा येतो. त्वचा पूर्ववत होण्यास मदत मिळते आणि हे जेल जागी लावावा चिकटून न राहिल्यामुळे त्वचेला त्रासही होत नाही. 

टूथपेस्ट लावणे: किरकोळ भाजल्यास त्यावर दात घासण्याची पेस्ट लावा. यामुळे त्वचा काळी पडत नाही आणि होणारी जळजळ थांबविण्यासही मदत मिळते.

 दही वापरा : भाजल्यानंतर जखम झालेल्या ठिकाणी दही लावावे. दह्यामुळे जखम थंड पडण्यास मदत मिळते आणि दही लावल्याने त्वचेवरची जळजळ कमी होते. मात्र, भाजल्यावर त्वरित यावर दही लावू नये, याची काळजी घ्या.

मधाचा वापर: भाजल्यावर जखमेवर मधही लावावा. त्यामुळे जखम बरी होते आणि डाग कमी पडतो. मध हे अत्यंत चांगले अँटीसेप्टिक असल्याने जखम भरते.

टॅग्स :मुंबईआग