पुन्हा गोंधळ न उडण्यासाठी काय पावले उचललीत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 05:28 AM2017-11-23T05:28:12+5:302017-11-23T05:28:21+5:30

मुंबई : आॅनलाइन मूल्यांकन पद्धतीमुळे पुन्हा अशा प्रकारे गोंधळ उडणार नाही, यासाठी काय उपाययोजना आखण्यात येणार आहेत? असा सवाल करत, उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाकडे याबाबत उत्तर मागितले आहे.

What steps did you take to fly again? | पुन्हा गोंधळ न उडण्यासाठी काय पावले उचललीत ?

पुन्हा गोंधळ न उडण्यासाठी काय पावले उचललीत ?

Next

मुंबई : आॅनलाइन मूल्यांकन पद्धतीमुळे पुन्हा अशा प्रकारे गोंधळ उडणार नाही, यासाठी काय उपाययोजना आखण्यात येणार आहेत? असा सवाल करत, उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाकडे याबाबत उत्तर मागितले आहे, तसेच हिवाळी सत्राच्या परीक्षांचेही आॅनलाइन मूल्यांकन होणार का, याचेही उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला दिले.
हिवाळी सत्राच्या परीक्षांमध्ये आॅनलाइन मूल्यांकनामुळे काही गोंधळ उडाला, तर संबंधित अधिकाºयाला जबाबदार धरण्यात येईल, अशी हमीही न्या. भूषण गवई व न्या. संदीप शिंदे यांनी विद्यापीठाला देण्याचे निर्देश दिले.
आॅनलाइन मूल्यांकन पद्धतीमुळे यंदाच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल लावताना झालेल्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. हाच घोळ पुन्हा होणार नाही, यासाठी विद्यापीठाने कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत? तसेच याही वेळी आॅनलाइन मूल्यांकन पद्धतीचा वापर करणार का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने विद्यापीठाकडे बुधवारी केली.
आॅनलाइन मूल्यांकन पद्धतीमुळे निकाल लागण्यास विलंब झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, तसेच विद्यापीठाने कोणतेही प्रशिक्षण न देता व कोणतेही नियोजन न करताच आॅनलाइन मूल्यांकन पद्धत सुरू केल्याने, महाविद्यालयांच्या शिक्षकांनीही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर बुधवारी सुनावणी होती.
दरम्यान, विद्यापीठाच्या वकिलांनी हिवाळी सत्राच्या परीक्षांचा निकाल लावताना आॅनलाइन मूल्यांकन पद्धतीचा वापर करणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली. मात्र, गोंधळ न उडण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे, असेही न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने सीस्टिममध्ये काय सुधारणा करण्यात आली आहे, याची माहिती विद्यापीठाला देण्यास सांगितले. याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी आहे.

Web Title: What steps did you take to fly again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.