धूम्रपान करणाऱ्यांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी काय पावले उचलणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:05 AM2021-06-17T04:05:17+5:302021-06-17T04:05:17+5:30

उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली विचारणा धूम्रपान करणाऱ्यांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी काय पावले उचलणार? उच्च न्यायालय; राज्य सरकारकडे केली ...

What steps will be taken to protect smokers from corona? | धूम्रपान करणाऱ्यांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी काय पावले उचलणार?

धूम्रपान करणाऱ्यांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी काय पावले उचलणार?

Next

उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली विचारणा

धूम्रपान करणाऱ्यांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी काय पावले उचलणार?

उच्च न्यायालय; राज्य सरकारकडे केली विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याची शक्यता असलेल्या धूम्रपान करणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय पावले उचलणार, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे बुधवारी केली.

यासंदर्भात पुढील सुनावणीत प्रतिज्ञापत्र सादर करू, असे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्या. एस.पी. देशमुख व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला सांगितले.

कोरोनावरील औषधे व उपलब्ध संसाधनांचे व्यवस्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर बुधवारी सुनावणी होती. केंद्र सरकारच्या या ॲटेमिक एनर्जी विभागांतर्गत कार्यरत असलेल्या टाटा मेमोरियल सेंटरच्या तज्ज्ञांनी धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे म्हटले आहे. या विषयावर जगातील अनेक देशांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यासाचा हवाला देत तज्ज्ञांनी धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे म्हटले आहे, असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले.

* श्वसन क्रियेवर आधीच झालेला असताे परिणाम

कोरोना आपल्या श्वसन क्रियेवर परिणाम करतो. जे धूम्रपान करतात त्यांच्या श्वसन क्रियेवर आधीच परिणाम झालेला असतो, असे म्हणत कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, वरिष्ठ अधिकारी यासंदर्भात २५ जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करतील. जर धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा अधिक धोका आहे, तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार काय पावले उचलणार आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली. गेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला तात्पुरत्या स्वरूपी सिगारेट व विडीवर बंदी घालण्याची सूचना केली होती.

------------------------------

Web Title: What steps will be taken to protect smokers from corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.