Join us

What a symbolic picture... अमित शहा अन् जितीन प्रसाद यांच्या फोटोतून काढला अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 8:25 PM

युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी जितिन प्रसाद आणि अमित शहा यांचा एक फोटो शेअर करत, जितिन प्रसाद यांना टोला लगावला आहे. सत्यजीत तांबे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये जितिन प्रसाद आणि अमित शहा एकत्र बसल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देयुवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी जितिन प्रसाद आणि अमित शहा यांचा एक फोटो शेअर करत, जितिन प्रसाद यांना टोला लगावला आहे. सत्यजीत तांबे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये जितिन प्रसाद आणि अमित शहा एकत्र बसल्याचे दिसत आहे.

मुंबई - माझे घराणे तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी (Congress) जोडलेले होते. यामुळे काँग्रेस सोडताना मी बराच काळ विचार केला. गेल्या 8-10 वर्षांपासून मला एकच पक्ष खरा राष्ट्रीय वाटत होता, तो म्हमजे भाजपा. बाकी सारे पक्ष हे स्थानिक झाले आहेत, असे काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर म्हटले. भाजपनेही जतिन प्रसाद यांचे थाटात स्वागत केले असून रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. तसेच, गृहमंत्री अमित शहांनीही प्रसाद यांचे स्वागत केले आहे. 

युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी जितिन प्रसाद आणि अमित शहा यांचा एक फोटो शेअर करत, जितिन प्रसाद यांना टोला लगावला आहे. सत्यजीत तांबे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये जितिन प्रसाद आणि अमित शहा एकत्र बसल्याचे दिसत आहे. पण, बैठक हॉलमध्ये प्रसाद यांच्या पाठिमागे हनुमानची मूर्ती दिसत आहे. विशेष म्हणजे आपली छाती फाडून प्रभू श्रीरामांचे दर्शन घडवणारी ही मूर्ती आहे. या मूर्तीच्या साक्षीवरुन सत्यजीत तांबे यांनी जितिन प्रसाद यांना टोला लगावला आहे. एकनिष्ठतेचं उदाहरण देणारी ही मूर्ती आहे. What a symbolic picture... असे ट्विट तांबे यांनी केले आहे. 

म्हणून भाजपात प्रवेश केला

देशाच्या भविष्यासाठी, कठीण प्रसंगांत जर कोणता पक्ष आणि नेता उभा असेल तर ती भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जर मी माझ्या लोकांच्या हिताचे रक्षण करू शकत नाही, तर अशा पक्षात राहण्यात काय अर्थ आहे, असे मला काँग्रेसमध्ये वाटत होते. मी तिथे काहीच करू शकत नव्हतो. मला ज्या काँग्रेस नेत्यांनी आशिर्वाद दिला त्यांचा मी आभारी आहे, आता मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, असे प्रसाद म्हणाले. जितिन प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, नड्डा भाजपा मुख्यालयात अनुपस्थित होते. 

निवडणुकांपूर्वीच काँग्रेसचा मोठा नेता भाजपात 

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh election) तयारीने वेग घेतला आहे. काँग्रेस सुस्त पडलेली असताना भाजपाने मुख्यमंत्र्यांपासून आमदारांच्या कामाचा आढावा आणि मतदारसंघातील वातावरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर आज भाजपाने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. 

टॅग्स :अमित शहाकाँग्रेसभाजपासत्यजित तांबे