Join us

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई नियमानुसारच; महापौर किशोरी पेडणेकर ठाम

By मोरेश्वर येरम | Published: November 27, 2020 1:57 PM

मुंबई हायकोर्टाने आज दिलेल्या निकालानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या कायदेशीर बाजू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

ठळक मुद्देमुंबई महापालिकेने नियमानुसारच कारवाई केल्याचा महापौरांचा दावामहापौर किशोरी पेडणेकर यांनी बोलावली महत्वाची बैठककंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई कोर्टाने ठरवली अवैध

मुंबईअभिनेत्री कंगना राणौतच्या मुंबईतील कार्यालयावरील महापालिकेने केलेल्या कारवाईवर मुंबई हायकोर्टाने ताशेरे ओढले. पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेने केलेली कारवाई नियमानुसारच केली असल्याचं ठाम मत व्यक्त केलं आहे. 

मुंबई हायकोर्टाने आज दिलेल्या निकालानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या कायदेशीर बाजू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. कंगनाच्या याचिकेवर हायकोर्टाने दिलेल्या निकालानंतर पुढील रुपरेषा या बैठकीत ठरविण्यात येणार असल्याचं कळतं. 

कंगनाचं ऑफिस तोडण्याची कारवाई अवैध; हायकोर्टाने झापलं

''मुंबई महापालिकेने केलेली कारवाई महापालिकेच्या नियमानुसारच केली आहे. मी अद्याप कोर्टाने दिलेला निकाल वाचलेला नाही. तो वाचल्यानंतरच अधिक स्पष्टता येईल'', असं पेडणेकर म्हणाल्या. 

कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई अवैधमुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई अवैध असल्याचा निकाल आज मुंबई हायकोर्टाने दिला. यासोबत नुकसान भरपाईचे आदेशही दिले आहेत. यासाठी झालेल्या नुकसानाचे मुल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण अधिकारी नेमण्यास कोर्टानं सांगितलं आहे व त्याचा अहवाल मार्च २०२१ पूर्वी सादर करावा लागणार आहे.

टॅग्स :किशोरी पेडणेकरकंगना राणौतशिवसेनाउच्च न्यायालय