मुंबईत घरांच्या दराचे काय होणार? बांधकाम साहित्याचे दर कमी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 12:28 PM2022-06-08T12:28:40+5:302022-06-08T12:31:52+5:30
Mumbai : गृहनिर्माण क्षेत्र त्यातून उभारत असले तरी घरांच्या भावात वाढ झाली असून, मागणीदेखील काही प्रमाणात वाढल्याचा दावा करत मुंबईमध्ये बांधकाम साहित्याचे दर कमी झाले आहेत हे प्रथमदर्शनी तरी निदर्शनास येत नसल्याचे गृहनिर्माण क्षेत्राने म्हटले आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात घरांचे भाव वाढतच असून, बांधकाम साहित्याचे दर कमी झाले तरी त्यात तसूभरही फरक पडलेला नाही. उलटपक्षी गेल्या दोन वर्षांपासून गृहनिर्माण क्षेत्राला कोरोनाचा जोरदार फटका पडला आहे. त्यात आता गृहनिर्माण क्षेत्र त्यातून उभारत असले तरी घरांच्या भावात वाढ झाली असून, मागणीदेखील काही प्रमाणात वाढल्याचा दावा करत मुंबईमध्ये बांधकाम साहित्याचे दर कमी झाले आहेत हे प्रथमदर्शनी तरी निदर्शनास येत नसल्याचे गृहनिर्माण क्षेत्राने म्हटले आहे.
वाढणाऱ्या किंमती रिअल इस्टेट उद्योगाला आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या संपूर्ण स्पेक्ट्रमवर परिणाम करत आहेत.
साहित्य खर्चाचा प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर परिणाम होत आहे.
इंधनाच्या किंमती सातत्याने चढत असताना, व्यावहारिकदृष्ट्या सर्व साहित्य आणि वस्तूंच्या किंमतीही वाढतात.
वाढीव इनपुट खर्चामुळे घरांच्या किंमतीमध्ये जवळपास १० % ने वाढ झाली आहे.
मालाड आणि कांदिवली हे मुंबईतील ‘निवासी हॉटस्पॉट’ म्हणून ओळखले गेले आहेत.
अंधेरी,बोरिवली-दहिसर,गोरेगावसह मीरा रोडच्या पलीकडे असलेल्या प्रदेशांमध्ये व्यावसायिक कार्यालयीन जागा, परवडणारी किंमत आणि मेट्रो मार्गाचे बांधकाम यामुळे घरांचा मागणी आणि पुरवठा दिसून आला आहे.
गेल्या वर्षापासून दरात चार ते पाच टक्के वाढ झाली आहे. आता मागणीमध्येदेखील वाढ झाली आहे. दोन वर्षांच्या स्लो डाऊन नंतर दरात चार ते पाच टक्के वाढ झाली आहे. मागणीमध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आता गृहनिर्माण क्षेत्राला चांगले दिवस येतील,अशी आशा आहे.
- आनंद गुप्ता, अध्यक्ष, गृहनिर्माण व रेरा समिती,बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया