राज ठाकरे काय घोषणा करणार? मनसे-भाजपा युती होणार? संदीप देशपांडेंनी सांगितली इनसाइड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 09:44 PM2024-04-08T21:44:04+5:302024-04-08T21:48:13+5:30

मनसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार याची चर्चा जोरदार सुरू आहे.  याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी इनसाइड स्टोरी सांगितली. 

What will Raj Thackeray announce? MNS-BJP alliance? Inside story told by Sandeep Deshpande | राज ठाकरे काय घोषणा करणार? मनसे-भाजपा युती होणार? संदीप देशपांडेंनी सांगितली इनसाइड स्टोरी

राज ठाकरे काय घोषणा करणार? मनसे-भाजपा युती होणार? संदीप देशपांडेंनी सांगितली इनसाइड स्टोरी

Raj Thackeray : राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुढीपाडवा मेळावा उद्या ९ एप्रिलला शिवाजी पार्क येथे होणार आहे. मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, मनसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) या मेळाव्यात काय बोलणार याची चर्चा जोरदार सुरू आहे.  याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी इनसाइड स्टोरी सांगितली. 

बाप-लेक आमनेसामने! गजानन किर्तीकरांची घोषणा; अमोल किर्तीकरांविरोधात लढणार

राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यामुळे आता ठाकरे काही राजकीय भमिका जाहीर करणार का? अशा चर्चा सुरू आहेत. "गुढीपाडवा मेळाव्याला दरवर्षी राज ठाकरे संबोधित करतात. पक्षाला पुढच एक वर्षी काय करायचं आहे, या मार्गदर्शन उद्या होईल. आम्हाला याची उत्सुकता आहे, असंही संदीप देशपांडे म्हणाले. राज ठाकरे यांच्या भाषणात सरप्राईज असतं, ते उद्याच समजेल. राजसाहेब जे राजकारण करतात ते सर्वसामान्यांच्या हिताच करतात, असंही देशपांडे म्हणाले. 

"भाजप नेत्यांच्या भेटीत काय घडलं याची माहिती उद्या राज ठाकरेच देतील. काही लोकांकडे वास्तुंचा वारसा असतो आमच्याकडे विचारांचा वारसा आहे, उद्या शिवतीर्थावर सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत, असंही संदीप देशपांडे म्हणाले.  

Web Title: What will Raj Thackeray announce? MNS-BJP alliance? Inside story told by Sandeep Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.