Join us

वादळी वारे, पावसात काय काळजी घ्याल ? इलेक्ट्रीक उपकरणे जाळू नका...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 11:21 AM

गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहर आणि उपनगरांत कमी वेळात मोठा पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहर आणि उपनगरांत कमी वेळात मोठा पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन तासांत पडलेल्या १०० मिलिमीटरहून अधिक पावसामुळे मुंबईची तुंबई होत असून, वादळी वाऱ्यामुळे येथील वीज यंत्रणांची हानीही मोठी होते. शिवाय पावसाचे पाणी साचून वीज यंत्रणेत तांत्रिक बिघाड होतो. परिणामी मुंबई अंधारात जात असून, यावर खबरदारी म्हणून महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा या वीज कंपन्यांनी कंबर कसली आहे. यासाठी आतापासून नियंत्रण कक्ष आणखी अपडेट करण्यापासून देखभाल दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे.

वीज उपकरण वापरताना ही काळजी घ्याn घरात ईएलसीबी (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर) असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीज पुरवठा बंद होऊन जीवितहानी टाळता येईल.n वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.n वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी आणि वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.n शॉवरखाली आंघोळ करू नये. घरातील बेसिनचे नळ, जलवाहिनीला स्पर्श करू नये. कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये.n विजेच्या गडगडाटासह वादळी वारे सुरू असताना लोखंडी धातूच्या मदतीने उभारलेल्या तंबू, शेड, उंच झाडाखाली आसरा घेऊ नये.n धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये. घरात असाल, तर उघड्या दारातून, खिडकीतून वीज पडताना पाहू नका.n पूर येण्यापूर्वी नागरिकांनी व्हॉटस्ॲप किंवा इतर समाजमाध्यमांवर कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये.n आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘एसएमएस’चा उपयोग करावा. आपला मोबाइल चार्ज करून ठेवावा.n हवामानातील बदलांची अद्ययावत माहिती रेडिओ, टी.व्ही.वर पाहत राहावी.n आवश्यक वस्तूंसह आपत्कालीन किट तयार ठेवावी.n आपली कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जलरोधक पिशवीत जवळ ठेवावीत.n जवळपास असलेली निवारा, पक्क्या घराकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग जाणून घ्यावा.n सिवरेज लाइन, गटारे, नाले, पूल, नदी, ओढे इत्यादींपासून दूर राहावे. ओपन ड्रेनेज किंवा धोक्याच्या ठिकाणी लाल झेंडे किंवा बॅरिकेड्स लावा.n पुराच्या पाण्यामध्ये चालू नका किंवा गाडी चालवू नका.n पुरातील पाण्यात वाहून आलेले अन्न खाऊ नका. n मलेरियापासून बचाव करण्यासाठी डासांच्या जाळीचा वापर करा.n जर गटार लाइन फुटली असेल तर शौचालयाच्या किंवा पिण्याच्या पाण्याच्या नळाचा वापर करू नका.

टॅग्स :वीज