Join us

चिन्ह कोणतही असो...; ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 4:00 PM

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला.

मुंबई- शिवसेनेचे (Shiv Sena) दिवंगत आमदार रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला.  ऋतुजा यांनी केवळ बहुमतच नव्हे तर रमेश लटके यांचा विक्रम मोडला आहे. रमेश लटकेंपेक्षा जास्त मते मिळवून ऋतुजा यांनी विजय मिळविला. या विजयाचा जल्लोष मातोश्री बाहेर सुरू आहे. यावर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. 

"लढाईची सुरुवातच विजयाने झाली आहे, त्यामुळे आता भविष्यातील विजयाची चिंता नाही. चिन्ह कुठलही असो पण जनता आमच्यासोबत आहेत. ज्यांनी आमचे नाव गोठवले, ते या निवडणुकीच्या आजुबाजूला फिरकलेले नाहीत, असा टोलाही शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

निवडणुकीअगोदरच भाजपला पराभवाचा अंदाज आला होता, त्यामुळे त्यांनी निवडणूक लढली नाही. जमिनिवरचे प्रकल्प गुजरातले गेले आहेत. हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात असंही उद्धव ठाकरे म्हणाले. नोटाला एवढं मतदान कोणी केले हे सगळ्यांना माहित आहे. त्यांनी निवडणूक लढवली असती तर ही नोटाची मत त्यांना मिळाली असती, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

विजयी! ऋतुजा लटकेंनी पतीचाही विक्रम मोडला; अपक्षांचे डिपॉझिटही जप्त केले

निवडणुकासमोर ठेवून राज्यातील प्रकल्प गुराजतला घेऊन गेले. गुजराच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर प्रेम वाढले आहे, प्रकल्पाबाबत चर्चा सुरू केली आहे, प्रकल्पाच्या भ्रमाचा फुगा फुटायच्याअगोदर  राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, हा माझा अंदाज आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

रमेश लटके हे अंधेरी पूर्वचे दोनवेळा आमदार होते. २०१४ मध्ये लटकेंना ५२८१७ मते मिळाली होती. तर २०१९ मध्ये ६२७७३ मते मिळाली होती. आज ऋतुजा लटकेंनी पतीला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते मिळविली आहेत. रमेश लटकेंना २०१९ च्या निवडणुकीत 62773 टक्के मते मिळालेली. अपक्ष मुरजी पटेल यांना 45808 मते मिळालेली. काँग्रेसच्या अमीन कुट्टी यांना 27951 मते पडलेली. तर नोटाला 4311 मते मिळालेली.

शेवटच्या फेरीत ऋतुजा लटके यांना ६६२४७ मते मिळाली. तर नोटाला १२७७६ मते मिळाली. 

अठराव्या फेरीतील मतमोजणी....

१) ऋतुजा लटके- ६६२४७

२) बाला नाडार - १५०६

३) मनोज नायक - ८८८

४) नीना खेडेकर- १५११

५) फरहाना सय्यद- १०८७

६) मिलिंद कांबळे- ६१४

७) राजेश त्रिपाठी- १५६९

आणि 

नोटा - १२७७६

एकूण मते : ८६१९८

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपामुंबई