मुंबई- १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन झाला. राष्ट्रवादीने आज वर्धापन दिन सोहळ्या निमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्याचं आयोजन केलं होत. या कार्यक्रमात पक्षातील नेत्यांनी संबोधित केलं. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही संबोधित केलं. पटेल यांनी खासदार शरद पवार यांच्या संदर्भातील काही राजकीय किस्सेही कार्यकर्त्यांना सांगितले. यात त्यांनी पक्षाच्या स्थापनेनंतर भाजपकडून आलेल्या ऑफरची आठवण करुन दिली.
"बस झालं, आता मला मला विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि…’’ अजित पवारांचं तुफान भाषण
प्रफुल्ल पटेल म्हणाले, काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. नरसिंह राव यांनी १९९१ ची निवडणुकीनंतर नेतृत्व कोण करणार हा प्रश्न होता. त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी भाजप एवढा मोठा पक्ष नव्हता. तेव्हा काँग्रेसला खूप महत्व होते. तेव्हा काँग्रेसने पक्षाचे नेतृत्व द्यावे अशा सूचना अनेक मान्यवरांनी केले होते. यावेळी शरद पवार यांना थांबवण्यासठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यांना त्या स्पर्धेतून बाजूला करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. जे १९९१ ला झाले तेच १९९६ लाही झाले. तेव्हा नरसिंह राव यांना बदलून शरद पवार यांना नेतृत्व दिलं तर आम्ही सर्व काँग्रेसला साथ देऊ असं अनेक नेत्यांनी सांगितलं. पण तेव्हाही मोठ षडयंत्र करत शरद पवार यांना दूर केलं, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
" काँग्रेसच्या ज्या वर्किंग कमिटीची निवडणूक व्हायची त्यात शरद पवार यांना पाडण्यासाठी काहीजण षडयंत्र रचायचे. आपला पक्ष राज्यात एवढा मोठा पक्ष असुनही आपला अजुनही एक नंबरचा पक्ष झालेला नाही ही एक शोकांतिका आहे, असंही पटेल म्हणाले.
यावेळी बोलताना भाजप सोबतच्या युतीच्या ऑफर संदर्भात किस्सा सांगितला. " शरद पवार यांची एक सिद्धांतीक बाजू आहे, १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत आपले ५८ आमदार निवडून आले होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान होते. त्यांनी तेव्हा शरद पवार यांना बोलावून भाजपसोबत युती करण्याची ऑफर दिली. तेव्हा त्यांनी एनडीएमध्ये एकत्र येऊन महाराष्ट्रात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करु, अशी ऑफर दिली होती, तेव्हा शरद पवार यांनी ही ऑफर नाकारली होती, शरद पवार त्यावेळी म्हणाले, ही ऑफर जरी चांगली असली तरी आपण भाजपसोबत जायच नाही. जरी आपल काँग्रेससोबत भांडण झाले असले तरी आपण दिल्ली सरकारमध्ये सामील व्हायच नाही. ही आठवण पटेल यांनी आज सांगितली.