पेट्रोल-डिझेलचे दर कधी वाढू शकतात?; सध्या इंधनाचे दर स्थिर कशामुळे, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 08:31 AM2022-01-14T08:31:30+5:302022-01-14T08:31:41+5:30

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने पुढील महिनाभरात इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यताही नगण्यच आहे.

When can petrol-diesel prices go up ?; Find out why fuel prices are so stagnant right now! | पेट्रोल-डिझेलचे दर कधी वाढू शकतात?; सध्या इंधनाचे दर स्थिर कशामुळे, जाणून घ्या!

पेट्रोल-डिझेलचे दर कधी वाढू शकतात?; सध्या इंधनाचे दर स्थिर कशामुळे, जाणून घ्या!

Next

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमालीच्या स्थिर आहेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने पुढील महिनाभरात इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यताही नगण्यच आहे.

कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार

  • गेल्या ७० दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
  • उल्लेखनीय म्हणजे याच कालावधीत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली.
  • ४ नोव्हेंबरनंतर देशभरात इंधनाचे दर वाढलेले नाहीत.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास आयात बिलावर त्याचा परिणाम होतो. कच्च्या तेलाच्या किमती जानेवारी अखेरीस ९० ते १०० डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडू शकतात. महागाई व रुपयाच्या किमतीवरही परिणाम संभवतो.  परंतु ५ राज्यांच्या निवडणुकांमुळे केंद्र सरकार किमान दोन महिने तरी पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढवण्याच्या मानसिकतेत नाही.

वाहतूक  सुरूच; तरीही...

  • कोरोनाची तिसरी लाट सुरू असली तरी लॉकडाउन होण्याची चिन्हे नाहीत.
  • लसीकरण आणि कोरोनाबाधितांमधील सौम्य लक्षणे यांमुळे संपूर्ण लॉकडाउन होणे शक्य नाही.
  • परिणामी देशभरात मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक सुरूच आहे.
  • याचाच अर्थ पेट्रोल आणि डिझेलची मागणी कायम आहे.

१० मार्चनंतरच दरवाढ?

  • ५ राज्यांचे निवडणूक निकाल १० मार्च रोजी लागणार आहेत.
  • या राज्यांच्या निकालानंतरच कदाचित पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात.

सध्या किती दर?

शहर    पेट्रोल    डिझेल 
मुंबई     १०९.९८    ९४.१४
दिल्ली     ९५.४१    ८६.६७
चेन्नई    १०१.४०    ९१.४३
कोलकाता    १०४.६८    ८९.७९

Web Title: When can petrol-diesel prices go up ?; Find out why fuel prices are so stagnant right now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.