गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमालीच्या स्थिर आहेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने पुढील महिनाभरात इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यताही नगण्यच आहे.
कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार
- गेल्या ७० दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
- उल्लेखनीय म्हणजे याच कालावधीत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली.
- ४ नोव्हेंबरनंतर देशभरात इंधनाचे दर वाढलेले नाहीत.
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास आयात बिलावर त्याचा परिणाम होतो. कच्च्या तेलाच्या किमती जानेवारी अखेरीस ९० ते १०० डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडू शकतात. महागाई व रुपयाच्या किमतीवरही परिणाम संभवतो. परंतु ५ राज्यांच्या निवडणुकांमुळे केंद्र सरकार किमान दोन महिने तरी पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढवण्याच्या मानसिकतेत नाही.
वाहतूक सुरूच; तरीही...
- कोरोनाची तिसरी लाट सुरू असली तरी लॉकडाउन होण्याची चिन्हे नाहीत.
- लसीकरण आणि कोरोनाबाधितांमधील सौम्य लक्षणे यांमुळे संपूर्ण लॉकडाउन होणे शक्य नाही.
- परिणामी देशभरात मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक सुरूच आहे.
- याचाच अर्थ पेट्रोल आणि डिझेलची मागणी कायम आहे.
१० मार्चनंतरच दरवाढ?
- ५ राज्यांचे निवडणूक निकाल १० मार्च रोजी लागणार आहेत.
- या राज्यांच्या निकालानंतरच कदाचित पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात.
सध्या किती दर?
शहर पेट्रोल डिझेल मुंबई १०९.९८ ९४.१४दिल्ली ९५.४१ ८६.६७चेन्नई १०१.४० ९१.४३कोलकाता १०४.६८ ८९.७९