Join us  

महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी कधी ?

By admin | Published: July 28, 2014 1:46 AM

गतवर्षी मध्य रेल्वेने सीएसटी स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकीचा शुभारंभ केला होता़ या निर्णयाचे महिला प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले

ठाणे : गतवर्षी मध्य रेल्वेने सीएसटी स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकीचा शुभारंभ केला होता़ या निर्णयाचे महिला प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले. ही सुविधा गर्दीच्या सर्वच स्थानकांवर असावी, असा प्रस्ताव महिला प्रवाशांच्या प्रतिनिधींनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निमग यांच्याकडे मांडला होता़ मात्र महिनोन्महिने हा प्रस्ताव धूळखात पडून राहिला आहे. सध्या सीएसटी, दादर आणि ठाणे येथे ही सुविधा असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने आणखी काही दिवस या खिडक्या प्रायोगिकतत्त्वावर ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या उपाध्यक्षा लता अरगडे, नाझिमा सय्यद, रेखा जाधव, अनिता झोपे आदींनी याबाबत रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. महिला तिकीट खिडकीच्या योजनेला प्रतिसाद चांगला आहे. त्यानुसार मनुष्यबळासह अन्य तांत्रिक बाबी तपासण्याचे काम सुरू आहे, तसेच अन्य कुठे ही सुविधा द्यावी, यासंदर्भात पाहणी सुरू असून त्या कधी सुरू करता येतील याचा अद्याप विचार झाला नसल्याचे म. रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितले. (प्रतिनिधी)